Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कॅश क्रेडिटधारकांना मोठा दिलासा; व्याजदर १० टक्के, कॅश क्रेडिट मर्यादा २० लाख

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (Pune District Central Co-Operative Bank) वैयक्तिक कॅश क्रेडिट धारकांना मोठा दिलासा असून कॅश क्रेडिवरील व्याजदरात दीड टक्के कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 30, 2022 | 06:40 PM
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कॅश क्रेडिटधारकांना मोठा दिलासा; व्याजदर १० टक्के, कॅश क्रेडिट मर्यादा २० लाख
Follow Us
Close
Follow Us:

बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (Pune District Central Co-Operative Bank) वैयक्तिक कॅश क्रेडिट धारकांना मोठा दिलासा असून, कॅश क्रेडिटवरील व्याजदरात दीड टक्के कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, एक ऑगस्ट २०२२ पासून वैयक्तिक कॅश क्रेडिटवरील व्याजदर साडेअकरा टक्क्यावरून दहा टक्के झाला असून, वैयक्तिक कॅश क्रेडिट मर्यादा २० लाख करण्यात आल्याची माहिती बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष हनुमंत शिंदे व सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड यांनी दिली.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पगारदार सभासदांना त्यांच्या पगाराच्या वीस पट पंधरा लाखापर्यंत वैयक्तिक कॅश क्रेडिट देते.त्याचा व्याजदर साडेअकरा टक्के होता.तो कमी व्हावा याबाबत शिक्षक संघासह जिल्ह्यातील सर्वच संघटनांनी वेळोवेळी मागणी केली होती.माजी अध्यक्ष रमेश थोरात,विद्यमान अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे सर यांच्या उपस्थितीत दिनांक ४ फेब्रुवारी २०२१ रोजी सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधींसोबत झालेल्या सहविचार सभेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस केशवराव जाधव यांनी वैयक्तिक कॅश क्रेडिटवरील व्याजदर कमी करावा अशी मागणी केली हाती.

जिल्ह्यातील सर्वच शिक्षक पतसंस्था नऊ टक्के पेक्षा कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करीत असल्याने कॅश क्रेडिटचा व्याजदर जास्त असल्याची भावना शिक्षक व्यक्त करीत होते.गेली दीड वर्षे व्याजदर कमी व्हावा याकरीता केशवराव जाधव यांनी सात्यत्याने पाठपुरावा केला.अखेर त्यांच्या प्रयत्नास यश आल्याने शिक्षक वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या निर्णयामुळे एक लाख रुपायास शंभर प्रमाणे २० लाखाचे दरमहा दोन हजार रुपये व्याज कमी द्यावे लागणार आहे.वर्षाला साधारणपणे चोवीस हजार रुपये व्याज कमी द्यावे लागणार आहे.

वैयक्तिक कॅश क्रेडिट मर्यादा २० लाख केल्याने शिक्षकाना त्यांच्या आर्थिक अडचणी सोडविणेकामी मोठा हातभार लागणार आहे. बँकेच्या या महत्त्वपूर्ण निर्णयांचे बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाने स्वागत केले असून, लवकरच विरोधी पक्षनेते अजित पवार, बँकेचे विद्यमान अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, माजी अध्यक्ष रमेश थोरात, संचालक संभाजी होळकर, दत्तात्रय येळे यांना भेटून आभार व्यक्त करणार असल्याचे बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे नेते महादेव गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: Big relief to cash credit holders of pune district central cooperative bank nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2022 | 06:40 PM

Topics:  

  • baramati
  • CENTRAL BANK

संबंधित बातम्या

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर
1

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Ajit Pawar: बारामती शहरात मुख्य ठिकाणी ‘सिग्नल यंत्रणा’ बसवा; अजित पवारांचे निर्देश
2

Ajit Pawar: बारामती शहरात मुख्य ठिकाणी ‘सिग्नल यंत्रणा’ बसवा; अजित पवारांचे निर्देश

Baramati Crime: भीषण अपघातानंतर पोलिसांना जाग; ओव्हरलोड वाहनांवर मोठी कारवाई, १४ वाहने जप्त
3

Baramati Crime: भीषण अपघातानंतर पोलिसांना जाग; ओव्हरलोड वाहनांवर मोठी कारवाई, १४ वाहने जप्त

बारामतीत बँक मॅनेजरची गळफास लावून आत्महत्या; सुसाईड नोटही आली समोर
4

बारामतीत बँक मॅनेजरची गळफास लावून आत्महत्या; सुसाईड नोटही आली समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.