Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Municipal Scam: नाशिक महापालिकेत मोठा घोटाळा उघड;  देवयानी फरांदेंनी थेट पेनड्राईव्ह दाखवला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेत हस्तक्षेप करत, संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शासनातील कोणी व्यक्ती या संस्थेला पाठीशी घालत असल्यास, त्याचीही चौकशी केली जाईल,

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 09, 2025 | 02:58 PM
Nashik Municipal Scam: नाशिक महापालिकेत मोठा घोटाळा उघड;  देवयानी फरांदेंनी थेट पेनड्राईव्ह दाखवला
Follow Us
Close
Follow Us:

Devyani Pharande News: राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या नाशिकचे राजकारण चर्चेत आहे. नाशिकच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी होत आहेत. अशातच नाशिकमधून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.  नाशिक महापालिकेत  कंत्राटी कामगारांचा मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे.  नाशिकच्या भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

देवयानी फरांदे यांनी नाशिकम महपालिकेतील घोटाळा झाल्याचा दावा केला आहे.  महापालिकेतील कंत्राटी  कामगार पुरवण्याचे काम  द्विग्वीजय एंटरप्राइजेस या संस्थेकडे देण्यात आले आहे.  या संस्थेला  महापालिकेतील काही अधिकाऱ्यांचाही पाठिंब असल्याचा दावा फरांदे यांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे,  महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना दहमहा २२ हजार रुपये वेतन दिले जाते. या कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांचे ATM कार्ड कंत्राटदार त्यांच्याकडे ठेवून घेतात आणि  वेतन झाल्यानंतर त्यांनी  १२ हजार रुपये काढून घेतात. कर्मचाऱ्याला केवळ १० हजार रुपयेच मिळतात, असा खुलासा  आमदार फरांदे यांनी केला आहे.

Rajasthan Plane Crash Video: इंडियन एअरफोर्सचे Jaguar क्रॅश; पायलट शहीद

याचवेळी फरांदे यांनी दिग्विजय एंटरप्राईजेसने केलेल्या संबंधित गैरव्यवहारांचे अनेक उदाहरणेही दिली आहेत.  आमदार फरांदे यांनी एक पेनड्राइव्ह सादर करत या संस्थेच्या गैरव्यवहारांचा पुरावाच दाखवला. नाशिक महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱी पुरवणाऱ्या संस्था वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

त्याचबरोबर महापालिकेच्या कंत्राटदाराने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (पीएफ) थकवून ठेवल्याचाही गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित कालावधीत महापालिकेकडून कर्मचाऱ्यांचे वेतन घेतले जाते. मात्र त्यांच्या पीएफचा हिस्सा देखील कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला नव्हता. हा प्रकार  महापालिका अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर याचा पर्दाफाश झाला. महापालिकेने कारवाईचा इशारा दिल्यानंतर कंत्राटदाराने थकीत पीएफची रक्कम भरल्याची माहिती आमदार राहुल ढिकले यांनी विधानसभेत दिली.

सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरीच्या ‘धडक २’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज, ट्रेलर ‘या’ होणार प्रदर्शित

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेत हस्तक्षेप करत, संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शासनातील कोणी व्यक्ती या संस्थेला पाठीशी घालत असल्यास, त्याचीही चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात किमान वेतन कायद्याचे उल्लंघन झाले की इतर कोणते नियम मोडले गेले आहेत, याची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या प्रकरणाच्या निमित्ताने महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सातत्याने होणारे शोषण पुन्हा समोर आले आहे. तक्रारी असूनही संबंधित संस्थेला वारंवार निविदा देण्यात आल्याने, त्यांच्या पाठीमागे कोणाचा राजकीय वरदहस्त आहे, याची चर्चा महापालिकेत सुरू झाली आहे.

संबंधित संस्थेला सत्ताधारी पक्षातील नेत्यांचे समर्थन असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळेच इतके गंभीर प्रकार घडूनही कारवाई टाळली गेल्याची भावना व्यक्त होत आहे. मात्र, आता थेट मुख्यमंत्र्यांनीच या प्रकरणात लक्ष घातल्याने, प्रत्यक्षात काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Big scam exposed in nashik municipal corporation devyani farande directly showed the pen drive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • Nashik News

संबंधित बातम्या

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी
1

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम
2

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Nashik : दिंडोरी तालुक्यात जोरदार आवाजाचा हादरा; 25 किलोमीटर परिसरातील घरांच्या काचा फुटल्या
3

Nashik : दिंडोरी तालुक्यात जोरदार आवाजाचा हादरा; 25 किलोमीटर परिसरातील घरांच्या काचा फुटल्या

Nashik News : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे बिबट्यांचा मुक्त संचार, नागरिकांमध्ये भितीचं वातावरण
4

Nashik News : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे बिबट्यांचा मुक्त संचार, नागरिकांमध्ये भितीचं वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.