दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून लखमापूर येथील मोगल वस्तीवर शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास भारत दौलत मोगल यांच्या पोल्ट्री फार्म मध्ये दोन बिबट्यांनी प्रवेश केला. याबाबत सविस्तर माहिती अशी की मध्यरात्रीच्या दोन वाजेच्या सुमारास मोगल वस्तीवर असलेल्या पोल्ट्री फार्म च्या शेजारी एका झाडावर दोन बिबटे आढळून आले. बिबट्यांनी झाडावरून पोल्ट्री फार्म च्या पत्र्यावर उडी घेतली. सदरील पत्रे सिमेंटचे होते त्याचवेळी पत्रा तुटल्याने दोन्ही बिबटे थेट पोल्ट्री फार्म मध्ये गेले. मात्र पोल्ट्री फार्ममध्ये पक्षी नसल्याने सदरील पोल्ट्री मालकाचं आर्थिक नुकसान होता होता राहिलं आहे. असं असलं तरी बिबट्याच्या मुक्त संचाराने परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.