वायुसेनेचे लढाऊ विमान क्रॅश (फोटो- @vani_mehrotra)
चुरु: राजस्थानमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. राजस्थानच्या चुरु भागात भारतीय वायुसेनेचे लढाऊ विमान क्रॅश झाले आहे. ही घटना राजस्थानच्या चुरु जिल्ह्यातील भानुदा हि घटना घडली आहे. वायू सेनेचे विमान क्रॅश झाल्याची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे.
BREAKING: Fighter jet crashes in Bhanuda village in Rajasthan's Ratangarh; rescue team on the spot pic.twitter.com/071ADfWGH5
— Vani Mehrotra (@vani_mehrotra) July 9, 2025
भारतीय वायुसेनेचे विमान क्रॅश झाल्यावर त्या ठिकाणी खूप मोठा आवाज झाला. या विमानाचे पायलट शहीद झाल्याचे समजते आहे. मात्र भारतीय वायुदलाने अजून अधिकृत माहिती दिलेली नाही. घटना घडताच स्थानिक नागरिक जमा झाले आणि त्यांनी मदतकार्य सुरू केले. आग विझवण्यासाठी लोकांनी प्रयत्न केला मात्र आगीवर नियंत्रण मिळवणे अशक्य होत होते.
विमान क्रॅश,पायलट शहीद
समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, भारतीय वायू दलाचे एक लढवून विमान राजस्थानच्या भानुदा गावात अपघातग्रस्त झाले आहे. यामध्ये पायलट शहीद झाल्याचे संगितले जात आहे. मात्र अजून वायुसेनेने अधिकृत माहिती दिली नाही. दुर्घटना झाल्यावर विमानाचे अवशेष दूरवर पसरले आहेत. दरम्यान बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
अहमदाबाद विमान अपघात प्रकरणातील प्राथमिक अहवाल सादर
अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघात प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या भीषण विमान अपघाताच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल नागरी उड्डाण मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. ही माहिती सरकारी सूत्रांच्या हवाल्याने वृत्तसंस्था एएनआयने दिली आहे. मात्र, अहवालातील निष्कर्ष अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाहीत.
या अपघाताची चौकशी एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) करत असून संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेण्यात येत आहे. १२ जून रोजी लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच मेघनानगरमधील एका वसतिगृह संकुलावर कोसळले. या दुर्घटनेत २४१ प्रवासी आणि जमिनीवरचे काही नागरिक मिळून एकूण २६० जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर देशभरात शोककळा पसरली होती. केंद्र सरकारने तात्काळ उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते.
Bihar Election: बिहार जिंकण्यासाठी नितीश कुमारांनी खेळला मोठा डाव; सरकारी नोकरीत महिलांना थेट…
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अपघातस्थळावरून सापडलेला ब्लॅक बॉक्स सुरक्षितरित्या हस्तगत करण्यात आला असून त्यातील क्रॅश प्रोटेक्शन मॉड्यूल (CPM) २५ जून २०२५ रोजी AAIBच्या प्रयोगशाळेत उघडण्यात आले. या मॉड्यूलमधून महत्त्वपूर्ण फ्लाइट डेटा आणि संवाद नोंदी यशस्वीरित्या डाउनलोड करण्यात आल्या आहेत. या डेटाच्या आधारे अपघाताचे नेमके कारण – तांत्रिक बिघाड की मानवी चूक – हे निश्चित करण्यात येणार आहे. एक प्रवासी गंभीर जखमी अवस्थेत बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.