मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत दररोज नवनवीन अपडेट्स येत असतात. राज्यात सध्या अडीच कोटींहून अधिक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. प्रत्येक महिलेच्या खात्यात दरमहा १५०० रुपायांची आर्थिक मदतही मिळत आहे. पण दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकाने या योजनेतील निकष अधिक कठोर कऱण्याचा निर्णय घेतला आहे. निकषात न बसणाऱ्या महिलांना १५०० रुपयांची आर्थिक मदत मिळणार नाही, त्यामुळे महिला वर्गात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करतानाच राज्य सरकारकडून काही निकष ठरवण्यात आले होते. या निकषानुसार, ज्या महिला आधीपासूनच कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असतील, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते. पण विधानसभा निवडणुकांच्या वेळी निकषांचे पालन न झाल्यामुळे काही महिलांनी एकाचवेळी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेतला. राज्यात सरकार स्थानप होऊन तीन महिने उलटल्यानंतर आता सरकारकडून या प्रकरणाची पुन्हा पडताळणी करण्यात येणार आहे. अशा लाभार्थी महिलांची संख्या तब्बल ९ लाख आहे.
माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील तब्बल नऊ लाख महिलांना एकाच वेळी दोन सरकारी योजनांचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहेत. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक महिला नमो शेतकरी योजनेचाही लाभ घेत आहेत त्यामुळे आता त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा १५०० रुपये मिळण्याऐवजी केवळ ५०० रुपये मिळणार आहेत. त्यामुळे यापुढे महिलांना वार्षिक १८,००० रुपये मिळण्याऐवजी आता फक्त ६,००० रुपये मिळतील.
राज्यातील लाखो महिला आज नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना वर्षाला १२ हजार रूपयांचा लाभ घेत आहेत. यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रत्येकी ६,००० रुपयांचा वाटा उचलतात. तर लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार, कोणत्याही लाभार्थी महिलेला वार्षिक १८ हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळू शकत नाही. सध्या ९ लाख महिलांना नमो शेतकरी योजनेतून १२ हजार रुपये आणि लाडकी बहीण योजनेतून १८ हजार रुपयांचा आर्थिक लाभ घेत आहेत. म्हणजेच त्यांना वार्षिक ३० हजार रुपयांचा लाभ होत आहे. त्यामुळे या महिलांना यापुढे लाडकी बहीण योजनेअंतर्गत १,५०० रुपये नव्हे, तर केवळ ५०० रुपये मिळणार आहेत. राज्य सरकारने यासंदर्भात प्रस्ताव तयार केला असून, माहिती प्रसारण विभागाने नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची यादी महिला व बालविकास मंत्रालयाकडे पाठवली आहे.
‘भागवतांना नागपुरातून उचलून मुंबईत आणण्याचे आदेश परमबीर सिंहांनी दिले होते’; माजी अधिकाऱ्याचा