Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट, मागासवर्ग आयोगाचा अहवाल मराठ्यांकडून; आरक्षण देण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली, वाचा सविस्तर

Maratha Reservation : महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून कित्येक महिन्यांपासून सुरू असलेले मनोज जरांगेंनी पुकारलेले आंदोलन अंतिम टप्प्यात आहे. मुंबईकडे निघालेल्या आंदोलकांना सरकारने दिलेल्या अध्यादेशानंतर त्याची कायद्यात अंमलबजावणी करण्याकरिता मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे शस्त्र उगारले आहे. तरी आता सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 15, 2024 | 09:39 PM
Maratha Reservation

Maratha Reservation

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मराठा आरक्षणावरून निघालेल्या मराठा मोर्चाला सरकारने अध्यादेश काढून आरक्षण दिले होते. परंतु, त्याची कायद्यात अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे सर्व अपूर्ण असणार आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा याची कायद्यात अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचे सांगितले. दरम्यान, सततच्या उपोषणामुळे मनोज जरांगे यांची प्रकृती चांगलीच खालावली आहे.

20 आणि 21 फेब्रुवारी असं दोन दिवसांचं विशेष अधिवेशन

आता शिंदे सरकारनं 20 आणि 21 फेब्रुवारी असं दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा कायदा करण्यात येणार असल्याची माहिती गोपनीय सूत्रांच्या आधारे मिळाली आहे. त्यासाठीच मागासवर्ग आयोगाला अहवाल तयार झाला असून, तो अहवाल सकारात्मक असल्याची माहिती गोपनीय सूत्रांच्या आधारे कळाली आहे.

महाराष्ट्रात मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण

मराठा आरक्षणाबाबतची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण लागू करण्यासाठी मराठा समाज हा मागास आहे, हे महाराष्ट्र सरकारला सुप्रीम कोर्टात सिद्ध करावं लागणार आहे. मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आली आहे. ही मराठा समाजाला आरक्षणासाठी शेवटची संधी असणार आहे. त्यामुळे राज्य सरकार या प्रकरणात अतिशय महत्त्वाची पावले टाकत आहे.

मराठा आरक्षण याआधी मुंबई हायकोर्टात वैध

मराठा आरक्षण याआधी मुंबई हायकोर्टात वैध ठरवले होतं. पण, सुप्रीम कोर्टात त्या निकालाला आव्हान देण्यात आलं होतं. सुप्रीम कोर्टात मराठा समाज मागास आहे हे सिद्ध न झाल्यामुळे हे आरक्षण टिकलं नाही. पण आता क्युरेटिव्ह पिटीशनच्या सुनावणीवेळी सरकार पुराव्यानिशी मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे यासाठी मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षण करुन अहवालही तयार करण्यात आलाय. हा अहवाल मराठ्यांच्या बाजूने असल्याची माहिती सूत्रांनी गोपनीय सूत्रांच्या आधारे कळाली आहे.

मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडत असली, तरी उपचारासाठी जरांगेंनी नकार दिला आहे. शिंदे सरकारनं 20 आणि 21 फेब्रुवारी असे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा कायदा करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यासाठीच मागासवर्ग आयोगाला अहवाल तयार झाला असून, तो अहवाल सकारात्मक असल्याची माहिती मिळाली आहे.

SEBC द्वारे 13 टक्के आरक्षणाचा कायदा होण्याची शक्यता
फडणवीस सरकारने दिलेल्या SEBC द्वारे मराठ्यांना नोकऱ्यांमधील 13 टक्के आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले होते. आता पुन्हा SEBCद्वारे परत त्रुटी दूर करुन 13 टक्के आरक्षणाचा कायदा होऊ शकतो. आरक्षण रद्द करताना ज्या त्रुटी सुप्रीम कोर्टानं काढल्या होत्या त्या त्रुटी दूर करण्याचं काम करुन मराठा समाज मागास आहे, असा अहवाल तयार झाल्याचं कळतंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अहवाल सकारात्मक असल्याची प्राथमिक माहिती आहे. मराठा समाज मागास असल्याचा आयोगाचा अहवाल असे कळाले आहे. आयोगात 7 सदस्यांपैकी बहुतांश सर्वांचे एकमत असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रात मराठ्यांची संख्या किती ते स्पष्ट होणार
महाराष्ट्रात 32 ते 36 टक्के एकूण मराठा असल्याची अहवाल आकडेवारीचंही समजत आहे. 24 तासांत अहवाल सरकारला सादर होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या त्रुटी दूर केल्याची अहवालात नोंद आहे. विशेष म्हणजे मागासवर्ग आयोगाचा अहवाल मराठीसह इंग्रजीतही आहे.

मुंबई हायकोर्टातही सुनावणी

दरम्यान, जरांगेंनी उपचारास नकार दिल्यानंतर यावर मुंबई हायकोर्टातही सुनावणी झाली. हायकोर्टाने म्हटले आहे की, फक्त सलाईन घेणे म्हणजे उपचार घेणे होत नाही. उपचार घेण्यास अडचण काय आहे? जरांगेंनी उपचार घ्यावा. मात्र, रक्ततपासणी त्यांच्या परवानगीशिवाय करु नये, असं हायकोर्टाने म्हटलं आहे. तर सगेसोयऱ्यांच्या कायद्याशिवाय उपचार घेणार नाही, अशी भूमिका जरांगेंनी घेतली आहे. जरांगेंनी पाणी घेण्यास सुरुवात केलीय. पण अन्नाचा त्याग केलाय. आता कोर्टानंही उपचार घेण्याच्या सूचना केल्यात. दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगेंच्या उपोषणावरुन त्यांना पुन्हा एकदा डिवचलंय. अधिवेशन होणारच आहे हे पाहूनच, श्रेय घेण्यासाठी जरांगे उपोषण करत असल्याची टीका भुजबळांनी केलीय.

Web Title: Big update on maratha reservation backward classes commission report from maratha strong move to give reservation nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2024 | 09:37 PM

Topics:  

  • Maratha community
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप
1

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार
2

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार

‘कोणीही आडवा आला, माझा जीव गेला तरी…’; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा
3

‘कोणीही आडवा आला, माझा जीव गेला तरी…’; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा

Maratha andolan riots : मराठा आरक्षणाचा वाद पेटणार! मुंबईतील आंदोलनात दंगली पेटवण्याचा डाव, जरांगे पाटलांचा गंभीर दावा
4

Maratha andolan riots : मराठा आरक्षणाचा वाद पेटणार! मुंबईतील आंदोलनात दंगली पेटवण्याचा डाव, जरांगे पाटलांचा गंभीर दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.