Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Graduate Election: पदवीधरांच्या नोंदणीची राजकीय स्पर्धा; भाजप, काँग्रेसकडून नोंदणीच्या उच्चांकासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा

औरंगाबाद मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणुक पुढील वर्षी होणार आहे. या निवडणुकीची मतदार नोंदणी करण्यासाठी भाजप आणि कॉंग्रेसमध्ये चुरस लागली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 07, 2025 | 02:57 PM
BJP and Congress in a tight race for Aurangabad Marathwada graduate election registration

BJP and Congress in a tight race for Aurangabad Marathwada graduate election registration

Follow Us
Close
Follow Us:

Graduate Election: नांदेड : औरंगाबाद मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणुक पुढील वर्षी होणार आहे. या निवडणुकीची मतदार नोंदणी करण्यासाठी गुरूवार दि. ६ रोजी शेवटचा दिवस होता, शेवटच्या क्षणापर्यंत नोंदणी करत भाजप, काँग्रेस या प्रमुख पक्षांनी उच्चांकासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याचे दिसून आले आहे. या दोन्ही पक्षांच्या माध्यमातून नेमके किती पदवीधरांची नोंदणी करण्यात आली याची आकडेवारी पुढे आली नसली तरी भाजपने सर्वतोपरी आपली ‘शक्ती’पणाला लावली होती.

ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीत भाजपच आघाडीवर असल्याचे बोलले जात असून भाजपकडे पदवीधरांचा जास्तीचा कल असल्याचे सध्यस्थितीत दिसून आले आहे. पदवीधर मतदारसंघावर भाजपचा झेंडा फडकाविण्यासाठी रणनीती आखण्यात आली असून नांदेड जिल्ह्यात नोंदणीचा उच्चांक करण्यासाठी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्यासह भाजपचे पाचही आमदार कामाला लागले आहेत. त्याचबरोब शेकडो प्राधिकारी आळस झटकून नोंदणींच्या कामाला लागले आहेत.

नांदेड महानगरात जास्तीत जास्त नोंदणी करण्याचा संकल्प महानगर अध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी केला होता. त्या अनुषंगाने त्यांनी संपूर्ण यंत्रणा कामाला लावल्याचे दिसून आले. दक्षिणचे जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी आपल्या अखत्यारीतील सर्वच तालुक्यांमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने विक्रमी नोंदणी केल्याचे सांगण्यात आले आहे. दक्षिणप्रमाणे उत्तरमध्ये भाजपने पदवीधरांच्या नोंदणीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. माजी मुख्यमंत्री अशोक  चव्हाण यांनी या नोंदणीत लक्ष घातले, त्यामुळे भोकर मतदारसंघात भाजप नंबर १ असेल, असे सांगण्यात आले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

भाजपच्या नोंदणीत होईल वाढ ?

भाजप महानगरच्या वतीने पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्यात आली असून ऑफलाईन व ऑनलाईन नोंदणी झाली आहे, अंतिम आकडेवारी अजून आली नाही. नांदेड महानगरात पंधरा हजाराहून अधिक पदवीधरांची नोंदणी भाजपने केली असून यात आणखी वाढ होवू शकतेअशी माहिती भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनी दिली आहे.

पदवीधरांच्या नोंदणीसाठी काँग्रेसही यात मागे राहिली नाही, युवा मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने खासदार रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात आपली यंत्रणा कामाला लावली होती, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सहसमन्वयक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आलेले युवा नेते महेश देशमुख यांनी मराठवाड्‌यातील आठही जिल्ह्यांच्या दौरा केला असून मराठवाड्यात काँग्रेसला चांगला प्रतिसाद असल्याचे सांगण्यात आले आहे. शेवटच्या दिवसापर्यंत या दोन प्रमुख पक्षांमध्ये नोंदणीची राजकीय स्पर्धा लागल्याचे पहायला मिळाले.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

तरुणांचा भरभरुन प्रतिसाद

काँग्रेसने पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नोंदणी करण्याचे नियोजन होते, त्या अनुषंगाने मराठवाड्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून सध्यस्थितीत नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यात ५०ते ६० हजार पदवीधरांची नोंदणी झाली आहे, यात आणखी वाढ होईल, अंतिम आकडेवारीचा तपशील आला नाही. पदवीधर मतदार संघ निवडणुकीचे सहसमन्वयक महेश देशमुख यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडी व महायुतीतील अन्य घटक पक्षांनी फारसा गाजावाजा नोंदणीसाठी केला नसला तरी समाजमाध्यमातून नोंदणीचे आवाहन काही पक्षांनी केले होते. त्याचा कितपत फायदा या पक्षांना झाला, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. प्रशासनाकडून नोंदणीच्या अंतिम आकडेवारीचा तपशील अजून जाहीर झाला नाही. त्यामुळे राजकीय पक्षांच्या माध्यमातून करण्यात आलेली नोंदणी प्रशासनाने ‘मान्य’ केली का? हे नंतरच स्पष्ट होणार आहे.
नागपूर येथे सहआयुक्त पदावर विजमान केले आहे.

Web Title: Bjp and congress in a tight race for aurangabad marathwada graduate election registration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 02:57 PM

Topics:  

  • Nanded
  • political news

संबंधित बातम्या

Local Body Elections 2025: महिला नगराध्यक्षपदासाठी चुरस वाढली! वसमतकर थेट नगराध्यक्ष निवडणार; ५९ हजार ८५५ मतदार
1

Local Body Elections 2025: महिला नगराध्यक्षपदासाठी चुरस वाढली! वसमतकर थेट नगराध्यक्ष निवडणार; ५९ हजार ८५५ मतदार

Vande Mataram: भारताच्या अमर आत्म्याचा आवाज…! वंदे मातरमच्या १५० वर्षेपूर्ती दिनी मल्लिकार्जुन खर्गे यांचे खास पत्र
2

Vande Mataram: भारताच्या अमर आत्म्याचा आवाज…! वंदे मातरमच्या १५० वर्षेपूर्ती दिनी मल्लिकार्जुन खर्गे यांचे खास पत्र

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची ‘एकला चलो रे’ची भूमिका? आघाडीची शक्यता धूसरच…
3

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची ‘एकला चलो रे’ची भूमिका? आघाडीची शक्यता धूसरच…

Nanded : हदगावात परतीच्या पावसाचा कहर! पावसाने उध्वस्त पिकांमुळे हदगावातील शेतकरी चिंतेत
4

Nanded : हदगावात परतीच्या पावसाचा कहर! पावसाने उध्वस्त पिकांमुळे हदगावातील शेतकरी चिंतेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.