Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधानांच्या मातोश्रींच्या एआय व्हिडिओवरून भाजपचा संताप; पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेसविरोधात जोरदार आंदोलन

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचा अवमान केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाने आज पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार आंदोलन केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 13, 2025 | 06:05 PM
पंतप्रधानांच्या मातोश्रींच्या एआय व्हिडिओवरून भाजपचा संताप; पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेसविरोधात जोरदार आंदोलन

पंतप्रधानांच्या मातोश्रींच्या एआय व्हिडिओवरून भाजपचा संताप; पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेसविरोधात जोरदार आंदोलन

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचा अवमान केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाने आज पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार आंदोलन केले आहे. “स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी” या भारतीय संस्कृतीच्या मूल्यांवर आघात करणाऱ्या काँग्रेसच्या विचारधारेचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे, असं भाजपकडून सांगितले. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आणि महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी येथील भाजपा पक्ष कार्यालयाजवळ सकाळी १० वाजता आंदोलन पार पडले. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत काँग्रेसविरोधात संताप व्यक्त केला. या आंदोलनात शहरातील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विशेषतः महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.

“काँग्रेसची विचारधारा नेहमीच विष पेरणारी असून, ती नारीशक्तीचा अवमान करणारी आहे. पंतप्रधान हे देशाचे असतात आणि त्यांच्या आईबद्दल अपशब्द वापरणे किंवा त्यांचे वाईट पद्धतीने चित्रण करणे हा देशातील सर्व मातांचा अपमान आहे. ही मातृशक्ती कधीही सहन करणार नाही,” असे प्रतिपादन शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी आंदोलनावेळी केले. या आंदोलनातून काँग्रेसच्या कृत्याचा तीव्र निषेध करण्यात आला.

तसेच “मातृशक्तीचा अनादर सहन केला जाणार नाही” असा ठाम संदेश देत, जनतेलाही मातृशक्तीच्या सन्मानासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले. शहरातील विविध भागामधून देखील आंदोलने पार पडल्याने काँग्रेसविरोधात संतापाचे वातावरण दिसून आले. भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून काँग्रेस पक्ष कार्यालयात बांगड्या पाठविण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

या वेळी संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस वैशाली खाडये, सरचिटणीस मधुकर बच्चे, उपाध्यक्ष राम वाकडकर, राजू दुर्गे, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव, प्रवक्ते कुणाल लांडगे, अजित बुर्डे, रमेश वहिले, विजय शिणकर, राजेंद्र बाबर, मंडल अध्यक्ष सोमनाथ तापकीर, मोहन राऊत, गणेश ढोरे, अनिता वाळुंजकर, नामदेव पवार, हरीश मोरे, इंजी. संतोष भालेराव, डॉ. अमित नेमाने, अंकुश शिर्के, अतुल गाडगे, सुनील लांडगे, संतोष टोणगे, सचिन राऊत, खंडूदेव कठारे, ॲड. हर्षद नढे, ॲड. गोरख कुंभार, ॲड. युवराज लांडे, सागर बिरारी यांच्यासह शहरातील अनेक पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Web Title: Bjp has protested against congress after a video of prime minister narendra modis mother went viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 06:05 PM

Topics:  

  • Congress
  • MP Rahul Gandhi
  • Pimpri Chinchwad
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

नरीमन पाईंटलाच पक्षाला नवीन कार्यालय बांधून द्या, अन्यथा…; काँग्रेसचा इशारा
1

नरीमन पाईंटलाच पक्षाला नवीन कार्यालय बांधून द्या, अन्यथा…; काँग्रेसचा इशारा

PM Modi Manipur Visit: “माझे तुम्हाला वचन आहे, मी….; मणिपूर दौऱ्यात नरेंद्र मोदींचे सूचक विधान
2

PM Modi Manipur Visit: “माझे तुम्हाला वचन आहे, मी….; मणिपूर दौऱ्यात नरेंद्र मोदींचे सूचक विधान

Mallikarjun Kharge News: ‘त्यावेळी मोदींनी एकदाही मणिपूरला भेट दिली नाही,’; मोदींच्या दौऱ्यावर खर्गेंनी तोफ डागली
3

Mallikarjun Kharge News: ‘त्यावेळी मोदींनी एकदाही मणिपूरला भेट दिली नाही,’; मोदींच्या दौऱ्यावर खर्गेंनी तोफ डागली

रेल्वेच्या नकाशावर आले मिझोराम; PM नरेंद्र मोदींची ऐतिहासिक भेट; तब्बल 9 हजार कोटींच्या…
4

रेल्वेच्या नकाशावर आले मिझोराम; PM नरेंद्र मोदींची ऐतिहासिक भेट; तब्बल 9 हजार कोटींच्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.