Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आपटेला वाचविण्यासाठी भाजपचे वकील? पुतळ्याचा विषय दडपण्याचा प्रयत्न – परशुराम उपरकर

माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याप्रकरणी आपटेला वाचविण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप केलाय. वकीलदेखील भाजपचे असून वाऱ्यानेच पुतळा पडल्याचे स्टेटमेंट करत असल्याचे आता सांगितले आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 06, 2024 | 08:47 PM
माजी आमदार परशुराम उपरकरांचे घणाघाती आरोप

माजी आमदार परशुराम उपरकरांचे घणाघाती आरोप

Follow Us
Close
Follow Us:

कणकवली/भगवान लोके:  मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटे हा कुणातरी बीजेपीच्या माणसाकडे लपून बसला होता हे आता सिद्ध झालं आहे. कारण या प्रकरणात काल आलेले वकील हे 

ठाण्यामधील भाजपाचे होते, तर दुसरे वकील हे राणे समर्थक राणेंचे कार्यकर्ते आणि सिंधुदुर्ग जिल्हा वकील सेलचे अध्यक्ष होते. आपटेला वाचवण्यासाठी भाजपा वकील देत आहे हे यातून स्पष्ट झाले आहे असे सांगत पुतळ्याचा विषय कुठेतरी दडपण्याचा प्रयत्न भाजपा करत असल्याचा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला.

कणकवली येथील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार परशुराम उपरकर बोलत होते. यावेळी त्यांना भाजपावर घणाघाती टीका केली. तर ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर सत्ताधारी पक्षांच्या ज्या भूमिका होत्या त्या संशयास्पद होत्या. काही पुढाऱ्यांनी तो पुतळा पाडला व दंगल घडवण्याचा काहीजण प्रयत्न करतात असं बोलून दाखवलं. तर काही ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी वाऱ्यामुळे पुतळा पडला असं वक्तव्य केलं. माजी खासदारांनी वैभव नाईक यांनी तो पुतळा पाडला असावा अशी शंका घेत असे  वक्तव्य केलं. परंतु हा पुतळा चुकीमुळे पडला त्यामुळे पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला.   

हेदेखील वाचा – Jaydeep Apte: छत्रपती शिवराय पुतळा दुर्घटना; आरोपी जयदीप आपटेला १० तारखेपर्यंत पोलीस कोठडी

काय आहे वकिलांचे स्टेटमेंट

वकिलांनी देखील पुतळा वाऱ्याने पडला हे तेच स्टेटमेंट केले आहे. मात्र तेथील स्थानिक म्हणतात की या वाऱ्याने आमचा एकही नारळ पडला नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीदेखील याबाबत भाष्य केले असून या पुतळ्याला स्टीलचा वापर करायला पाहिजे होता असेदेखील मत त्यांनी मांडले आहे. या प्रकरणात एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच मागील झालेल्या मोर्चात राणे भडकले आणि त्यांनी केलेली व्यक्तव्य ही बेताल असल्याचेही म्हटले आहे. 

नितेश राणे गप्प का?

नितेश राणेंवर डागली तोफ

यावेळी परशुराम उपरकर यांनी नितेश राणेंवरही तोफ डागली. राज्यभरात सर्वत्र फिरत असणारे या मतदारसंघाचे आमदार नितेश राणे हे स्वतःला हिंदूंचे गब्बर समजतात. ते नितेश राणे हिंदूंचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यावर या प्रकरणावर का बोलू शकले नाहीत असा तिखट सवाल उपरकर यांनी उपस्थित केलाय. आप्पासाहेब पटवर्धनांचा पुतळा बनवल्यानंतर आमदार राणेंचे काही फोटो आपटे सोबत व्हायरल झाले आहेत. त्यामुळेच जयदीप आपटे बद्दल आमदार नितेश राणे कुठेही बोलत नाहीत. त्यामुळेच ते जिल्ह्यातल्या प्रकरणावर लक्ष देत नाहीत. मात्र राज्यातल्या प्रकरणांवर बोलतात ही खरी या प्रकरणात शोकांतिका व यात खरी मेक आहे. असा टोलादेखील त्यांनी लगावलाय. 

हेदेखील वाचा – शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेतील आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला अखेर अटक; पोलिसांची मोठी कारवाई

हे माफी कधी मागणार?

ज्या जिल्ह्यात आपण राहतो त्या जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर बोलायचं नाही मात्र राज्यभरातील विषयांवर बोलायचं या संपूर्ण प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जरी माफी मागितली तरी जिल्ह्यातील स्थानिक भाजपचे लोक मात्र माफी मागत नाहीत. देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री किंवा भाजपच्या कोणत्याही लोकप्रतिनिधीने व खासदार नारायण राणे यांनी देखील माफी मागितलेली नाही. याचाच अर्थ या सर्वामागे भारतीय जनता पक्ष आहे, असाही आरोप त्यांनी केला 

Web Title: Bjp lawyer to save jaydeep apte claims parashuram uparkar attempts to suppress the subject of the statue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2024 | 08:47 PM

Topics:  

  • Latest Political News
  • MLA Nitesh Rane

संबंधित बातम्या

चीनमध्ये खळबळ! उच्चपदस्थ राजदूत लिऊ जियानचाओ यांना अटक, परराष्ट्र मंत्रिपदाच्या होते शर्यतीत
1

चीनमध्ये खळबळ! उच्चपदस्थ राजदूत लिऊ जियानचाओ यांना अटक, परराष्ट्र मंत्रिपदाच्या होते शर्यतीत

Nilesh Rane on Malegaon blast : “आतंकवादाचा अन् जिहादाचा रंग हा हिरवाच…; मालेगाव बॉम्बस्फोट निकालानंतर नितेश राणे आक्रमक
2

Nilesh Rane on Malegaon blast : “आतंकवादाचा अन् जिहादाचा रंग हा हिरवाच…; मालेगाव बॉम्बस्फोट निकालानंतर नितेश राणे आक्रमक

AIMIM नेता वारिस पठाण यांची जीभ घसरली, नितेश राणेंवर म्हणाले, ‘बेटा तू मस्जिदमध्ये ये…’, नव्या विवादाला फुटले तोंड
3

AIMIM नेता वारिस पठाण यांची जीभ घसरली, नितेश राणेंवर म्हणाले, ‘बेटा तू मस्जिदमध्ये ये…’, नव्या विवादाला फुटले तोंड

“आमच्याच तंगड्या वर करतो अन्…; भाजप आमदार बबनराव लोणीकर यांचे वादग्रस्त विधान, राजकारण तापलं
4

“आमच्याच तंगड्या वर करतो अन्…; भाजप आमदार बबनराव लोणीकर यांचे वादग्रस्त विधान, राजकारण तापलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.