Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tipu Sultan Controversy : कॉंग्रेस अध्यक्षांची छत्रपती शिवाजी महाराजांची टीपू सुलतानसोबत तुलना; नितेश राणेंनी दिला कडक इशारा

कॉंग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना केल्यामुळे वाद आणखी चिघळला आहे. यावरुन आता राजकीय टीका-टिप्पणी सुरु आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 15, 2026 | 02:08 PM
Nitesh Rane aggressive after Congress President compared Chhatrapati Shivaji Maharaj with Tipu Sultan

Nitesh Rane aggressive after Congress President compared Chhatrapati Shivaji Maharaj with Tipu Sultan

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्यामध्ये टिपू सुलतानवरुन वाद निर्माण
  • हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवरायांशी केली तुलना
  • मंत्री नितेश राणे यांची आक्रमक भूमिका
Tipu Sultan Controversy : मुंबई : मालेगाव महापालिकेमध्ये टिपू सुलतानचा फोटो लावल्यानंतर जोरदार वाद निर्माण झाला आहे. यावरुन भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत टीका केली. तर कॉंग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना केल्यामुळे वाद आणखी चिघळला आहे. यावरुन आता राजकीय टीका-टिप्पणी सुरु आहे. यामुळे भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आक्रमक भूमिका घेत यालाच जिहादी मानसिकता बोलतात..अशा शब्दांत टीका केली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला अगदी त्याचप्रमाणे टिपू सुलतान यांनी त्याच समकक्ष काम केलं आहे. त्यामुळे टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले गेलं पाहिजे, असे वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. यामुळे नवा वाद उफाळून आला आहे. यावरुन भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरुन भाजप मंत्री नितेश राणे यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

हे देखील वाचा : टिपू सुलतान हा पाकिस्तानचा नायक तर क्रिकेटचा सामना कशाला? खासदार संजय राऊतांची मॅचवरुन राजकीय टीका

नितेश राणे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन काँग्रेस पक्षाला इशारा दिला आहे. ते म्हणाले की, टिप्या ची बरोबरी शिवरायांशी करणे यालाच जिहादी मानसिकता बोलतात..ज्या टिप्याने लाखो हिंदूचे धर्मांतर केले.. मंदिर तोडली.. फक्त इस्लाम वाढवण्यात लक्ष दिले..तो आमच्या शिवरायांच्या जवळ पास पण येऊ शकत नाही ! कांग्रेस प्रदेश अध्यक्षांनी आपल्या कार्यालयात शिवरायांचे फोटो काडून टिप्या चे लाऊन दाखवावे मग बघु शिवरायांचे मावळे त्यांना महाराष्ट्र कसे फिरू देतात ! असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

हे देखील वाचा :  पुण्यात काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामने; दगडफेकीत महिला पोलिस जखमी

हा वाद निर्माण झाल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर त्यांच्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देत संविधानाचा दाखला दिला आहे. सपकाळ यांनी लिहिले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे शिवराय आमचा स्वाभिमान आहे आणि टिपू सुलतान पराक्रमी आणि स्वराज्यप्रेमी होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच ते इंग्रजाविरोधात लढत होते. ज्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे परकीयांशी लढत होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस ज्या संघ भाजपाच्या विचारातून येतात त्या विचारांचे लोक इंग्रजाची गुलामी आणि हेरगिरी करत होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला इतिहास शिकविण्याच्या भानगडीत पडू नये. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजप आणि आरएसएसच्या भगतसिंह कोश्यारी सह कुणी-कुणी काय-काय मुक्ताफळे उधळली आणि अवमान केलाय हे महाराष्ट्राची जनता विसरलेली नाही. संविधानाच्या मूळ प्रतिवर शिवाजी महाराज व टिपू सुलतान दोघांचेही चित्र आहे, असे मत हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले.

 

छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे शिवराय आमचा स्वाभिमान आहे आणि टिपू सुलतान पराक्रमी आणि स्वराज्यप्रेमी होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच ते इंग्रजाविरोधात लढत होते. ज्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे परकीयांशी लढत होते त्यावेळी देवेंद्र… pic.twitter.com/xb4MnsBGHe — Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) February 14, 2026

Web Title: Nitesh rane aggressive after congress president compared chhatrapati shivaji maharaj with tipu sultan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 02:08 PM

Topics:  

  • Harshwardhan Sapkal
  • MLA Nitesh Rane

संबंधित बातम्या

Sanjay Raut News: ‘तुम्ही सांगताय की मी सांगू?’;  राहुल नार्वेकरांचा व्हिडिओ शेअर करत संजय राऊतांचा खोचक सवाल
1

Sanjay Raut News: ‘तुम्ही सांगताय की मी सांगू?’; राहुल नार्वेकरांचा व्हिडिओ शेअर करत संजय राऊतांचा खोचक सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.