Brahmin Reservation: "ब्राह्मण समाजाला आरक्षणाची गरज नाही, जिथे जाऊ तिथे..."; माधव भंडारींचे मोठे विधान
ठाणे: भाजपचे माजी प्रवक्ते माधव भंडारी यांनी ब्राह्मण समाजाबद्दल एक मोठे विधान केले आहे. ब्राह्मण समाजासंदर्भात त्यांनी आरक्षणाविषयी भाष्य केले आहे. माधव भंडारी ही भाजपचे माजी प्रवक्ते आहेत. ब्राह्मण समाजाने कोणताही न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. स्वतंत्र भारताच्या जडणघडणीत ब्राह्मण समाजाचा वाट दुर्लक्ष करण्यासारखा नाहीये. देशातील उद्योगांच्या उभारणीत ब्राह्मण समाजाचे योगदान फार मोठे आहे, असे भाजपचे माजी प्रवक्ते माधव भंडारी म्हणाले आहेत. माधव भंडारी कल्याणमधील आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
कल्याणमध्ये ब्राह्मण सभेतर्फे राज्यभरात निवडून आलेल्या आमदारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. ब्राह्मण सभेतर्फे समाजातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माधव भंडारी बोलत होते. देशात समाजासाठी अनेक चळवळी झाल्या, त्या उभ्या करणारे बहुतेक ब्राह्मण होते. त्याच्यामुळे आपल्याला आरक्षणाची गरज नाही. आम्ही जिथे जाऊ तिथे आमचे स्थान निर्माण करू, असे माधव भंडारी म्हणाले.
कल्याण ब्राह्मण सभेतर्फे आचार्य अत्रे सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार किरण सामंत, आमदार संजय केळकर, भाजप नेते माधव भंडारी, भाजप आमदार सुधीर गाडगीळ, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशीष दामले, उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात बोलताना भाजप नेते आणि माजी प्रवक्ते माधव भंडारी म्हणाले, “राजकरणामध्ये संख्येचा आणि पैशांचा टक्का पाहिला जातो. जोपर्यंत आपला टक्का वाढणार नाही तोवर आपल्याला अपेक्षित असे यश मिळणार नाही. आता आपण साडे दहा – अकरा टक्क्यांमध्ये आहोत. हा आकडा काही कमी नाही. गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या समजाचा अपमान करण्याची मोहीम एका विशिष्ठ वर्गाकडून सुरू आहे. ते पाहिल्यानंतर आता गप्प राहून चालणार नाही असे वाटत आहे.”
पुढे बोलताना भाजप नेते आणि माजी प्रवक्ते माधव भंडारी म्हणाले, “पूर्वी काय इतिहास होता त्याला अर्थ नाही. हे केवळ आपल्याबद्दल नाहीये. मात्र समाजामधील एखाद्या घटकाला अपमान , वागणे सहन करावे लागत असेल तर बरोबर नाही. आपण ब्राह्मण आहोत म्हणून कोणताही न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. गावांमध्ये राहणाऱ्या ब्राह्मण समाजाला संरक्षणाची गरज आहे. त्यांच्या मागे भक्कमपणे उभे राहणे गरजेचे आहे. यासाठी लोकप्रतिनिधी यांनी आपली ताकद वापरणे आवश्यक आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी सुमारे 200 कोटी मागितले पाहिजेत.” परशुराम आर्थिक महामंडळासाठी 200 कोटी मागितले पाहिजेत अशी मगआणि भाजप नेते आणि माजी प्रवक्ते माधव भंडारी यांनी अध्यक्ष आशीष दामले यांच्याकडे केली.