प्रसाद लाड यांची मनोज जरांगे पाटील यांना राजकारणामध्ये येण्याचा सल्ला
मुंबई : राज्यामध्ये सध्या आरक्षणचा मुद्दा प्रकाशामध्ये आहे. मागील अनेक महिन्यांपासून मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. आता जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणावर बसले असून आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. जरांगे पाटील यांच्या विरोधात आता काही भाजप नेते उभे राहिले आहेत. आमदार प्रसाद लाड व प्रविण दरेकर यांनी जरांगे पाटील यांच्या भूमिकेला विरोध दर्शवला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांना राजकारणामध्ये येणाचा सल्ला दिला आहे.
काय म्हणाले प्रसाद लाड?
सोशल मीडियावर आपल्या ऑफिशियल अकाऊंटवरुव आमदार प्रसाद लाड यांनी व्हिडिओ शेअर केला आहे. शेअर करताना कॅप्शन दिले आहे की, “मनोजदादा, तुम्हाला विनंती वजा सल्ला आहे. संघर्षासाठी तुम्हाला विधानमंडळात यायचं असेल तर या, मी राजीनामा द्यायला तयार आहे. आपल्याला निवडून आणू, लढ्याला विधानसभेत उत्तर देऊ! परंतु मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचे नाही! एक मराठा लाख मराठा!”, असे कॅप्शन दिले आहे.
मनोजदादा,
तुम्हाला विनंती वजा सल्ला आहे.
संघर्षासाठी तुम्हाला विधानमंडळात यायचं असेल तर या, मी राजीनामा द्यायला तयार आहे.
आपल्याला निवडून आणू, लढ्याला विधानसभेत उत्तर देऊ!
परंतु मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचे नाही!
एक मराठा लाख मराठा!
जयोस्तू मराठा! pic.twitter.com/VDIpBr3wpI— Prasad Lad (@PrasadLadInd) July 21, 2024
मी आणि प्रवीण दरेकर राजीनामा देतो
पुढे प्रसाद लाड म्हणाले आहेत की, “मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे. त्यासाठी तुम्ही लढलंच पाहिजे. त्यामुळे मला वाटतं की तुम्ही राजकारणापासून थोडं अलिप्त राहायला हवं. प्रसाद लाड, प्रवीण दरेकर हे राजकारण करतात, असे तुम्ही म्हणता. पण मी म्हणतो की आम्ही राजकारण करत नाही, आम्ही राजकारणच करतो. कारण राजकारण हा आमचा पिंड आहे. पण समाजकारण हे आमचं ध्येय आहे. त्यामुळे तुम्ही समाजकारणापासून राजकारणापर्यंत जाऊ नका आणि खरंच तुम्हाला राजकारणात यायचं असेल तर मी स्वत: आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. माझ्याजागी तुम्हाला निवडून आणायला तयार आहे. सभागृहात या, सभागृहात चर्चा करा आणि नाही तर मग पुन्हा चर्चा करुया, असे तुम्हाला आवाहन करतो. भाऊ माझी ही विनंती तुम्ही मान्य करा. एकदा तरी मला चर्चेला बोलवा. नाहीतर राजकारणात या. मी आणि प्रवीण दरेकर राजीनामा देतो. तुम्ही आणि तुमचे पदाधिकारी सभागृहात या आणि तुमचा मुद्दा ठामपणे मांडा. आम्ही तुम्हाला मैदानात साथ द्यायला तयार आहोत””, अशा शब्दांत प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांना राजकारणामध्ये येण्याचा सल्ला दिला आहे.