Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Swatantra Veer Savarkar : पुण्यतिथीदिनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या; विधीमंडळामध्ये पहिल्यांदाच मागणी

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न द्या अशी मागणी आमदार प्रसाद लाड यांनी विधीमंडळामध्ये केली आहे, यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 26, 2026 | 03:38 PM
Prasad Lad demanded Swatantra Veer Savarkar awarded the Bharat Ratna award in Legislative Assembly

Prasad Lad demanded Swatantra Veer Savarkar awarded the Bharat Ratna award in Legislative Assembly

Follow Us
Follow Us:

Swatantra Veer Savarkar Bharatratna : मुंबई : आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची (Swatantra Veer Savarkar) पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने सर्वांनी त्यांनी अभिवादन केले असून स्मृती जागवल्या आहेत. सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामुळे विधीमंडळामध्ये देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या अशी मागणी करण्यात आली. याबाबत मागील अनेक वर्षांपासून मागणी केली जात आहे. याबाबत पहिल्यांदाच विधीमंडळामध्ये मागणी करण्यात आली आहे. (Maharashtra Politics)

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न द्या अशी मागणी राजकीय वर्तुळातून केली जात आहे. मागील अनेक वर्षांपासून हा मुद्दा नेत्यांच्या भाषणांमध्ये राहिला आहे. यावर पहिल्यांदाच विधीमंडळामध्ये बोलण्यात आले. राज्यामध्ये आणि देशामध्ये भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यां हिंदूत्वावादी विचारांचे सरकार आहे. मात्र अद्यापही भारतरत्न न दिल्यामुळे विरोधकांनी निशाणा साधला. यानंतर आता आज विधानपरिषदेत यासंदर्भात मागणी करण्यात आली हे. आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी आहे. त्यामुळे त्यांना भारतरत्न द्यावं, यासाठी आपण ठराव करावा आणि तो एकमताने संमत करून घ्यावा, अशी मागणी आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे.

हे देखील वाचा : बारामतीमध्ये रोहित पवारांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमक; जीसीए, व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल नाहीच

आरएसएसच्या शतकोत्सवी कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याबाबत वक्तव्य केले होते. त्यांना भारतरत्न दिल्यानंतर पुरस्काराचे महत्त्व वाढेल या आशयाचे वक्तव्य मोहन भागवत यांनी केले. याबाबत आता प्रसाद लाड यांनी विधीमंडळामध्ये भूमिका घेतली आहे. प्रसाद लाड म्हणाले की, भाजप नेते तथा आमदार प्रसाद लाड यांनी विधानपरिषदेत सावकरांना भारतरत्न देण्याबाबत मागणी केली आहे. स्वातंत्रवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा. संसदीय कार्यमंत्री यांनी असा प्रस्ताव हा केंद्र शासनाकडे पाठवावा, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अद्वितीय क्रांतिकारक, प्रखर राष्ट्रभक्त, द्रष्टे विचारवंत आणि प्रभावी साहित्यिक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मरणोत्तर “भारतरत्न” हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात यावा, ही नम्र व मनापासूनची विनंती विधान परिषदेच्या सभापतींना… pic.twitter.com/gDYzGR87D8 — Prasad Lad (@PrasadLadInd) February 26, 2026

हे देखील वाचा :  अजित पवारांसारख्या नेत्यांच्या मृत्यूवर FIR का घेतला जात नाही? पोलीस दबावाखाली; रोहित पवारांचा संशय

प्रसाद लाड यांनी विधीमंडळामध्ये हा मुद्दा मांडल्यानंतर यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे म्हणाले की, आम्ही हा ठराव सभापती महोदयांकडे मांडू आणि त्यांनतर आपण निर्णय घ्यावा, शासनाने प्रस्ताव आणावा लागेल. मी या परिषदेत असा प्रस्ताव आणतो पण तो सभागृहातही आणावा लागेल. त्यानंतर सभापती महोदय आपण निर्णय घ्यावा, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. त्यामुळे, महाराष्ट्र विधिमंडळातून आता सावरकरांच्या भारतरत्न पुरस्काराबाबत कार्यवाहीला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Prasad lad demanded swatantra veer savarkar awarded the bharat ratna award in legislative assembly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • political news
  • Prasad Lad
  • Swatantraveer Savarkar

संबंधित बातम्या

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात
1

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात

Satara District Bank : जावळी मतदारसंघाची निवडणूक अटळ; बिनविरोधचे स्वप्न धुळीला
2

Satara District Bank : जावळी मतदारसंघाची निवडणूक अटळ; बिनविरोधचे स्वप्न धुळीला

Congress Politics : राहुल गांधींची नवी कोअर टीम तयार; प्रणिती शिंदेंसह के. सी. वेणुगोपाल यांचाही समावेश
3

Congress Politics : राहुल गांधींची नवी कोअर टीम तयार; प्रणिती शिंदेंसह के. सी. वेणुगोपाल यांचाही समावेश

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन
4

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.