Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विखे-पाटील म्हणजे महादेवाच्या पिंडीवर बसलेले विंचू; भाजपच्याच नेत्याचा गंभीर आरोप

दरम्यान, 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र पिपाडा आणि राधाकृष्ण विखेपाटील यांच्या जोरदार लढत झाली होती. त्यावेळी पिपाडा यांचा 13 हजार मतांनी पराभव झाला. दरम्यान, 2019 साली काँग्रेसला रामराम करत राधाकृष्ण विखे पाटीलांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण कट्टर विरोधक मानले जाणाऱ्या  पिपाडा आणि  विखेपाटील यांच्यात 2019 मध्ये मनोमिलन घडवण्यात देवेंद्र फडवीसांना यश आले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 27, 2024 | 09:19 AM
विखे-पाटील म्हणजे महादेवाच्या पिंडीवर बसलेले विंचू; भाजपच्याच नेत्याचा गंभीर आरोप
Follow Us
Close
Follow Us:

अहमदनगर: राज्यातील विधानसभा निवडणुकांची अद्याप घोषणाही झालेली नाही. पण त्यापूर्वीच महायुतीतील वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. अहमदनगरच्या राजकारणातून अशीच एक बातमी समोर आली आहे. भाजप नेते राजेंद्र पिपाड यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. विधानभा निवडणुकीपूर्वीच  भाजपमध्ये हा वाद उफाळून आल्यामुळे अहमदनगरमध्ये राजकारण चांगलचं तापल आहे.

राधाकृष्ण विखे पाटलांमुळे अहमदनगरमध्ये भाजपची अधोगती झाली आहे. विखेपाटील म्हणजे महादेवाच्या पिंडीवर बसलेला विंचू आहे. त्याला मारायचं म्हटलं तर ती चप्पल महादेवाला लागते, अशी सणसणीत टीका राजेद्र पिपाडा यांनी केली आहे. राहाता शहरात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे.त्यांच्या या आरोपांमुळे आता भाजपमध्येच वादाची ठिणगी पडली आहे.

हेदेखील वाचा: भाजपने डाव टाकला; माजी मुख्यमंत्री गळाला लागला, ‘या’ दिवशी होणार प्रवेश

दरम्यान, 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र पिपाडा आणि राधाकृष्ण विखेपाटील यांच्या जोरदार लढत झाली होती. त्यावेळी पिपाडा यांचा 13 हजार मतांनी पराभव झाला. दरम्यान, 2019 साली काँग्रेसला रामराम करत राधाकृष्ण विखे पाटीलांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण कट्टर विरोधक मानले जाणाऱ्या  पिपाडा आणि  विखेपाटील यांच्यात 2019 मध्ये मनोमिलन घडवण्यात देवेंद्र फडवीसांना यश आले. पण लोकसभेला शिर्डी आणि अहमदनगर दक्षिण लोकसभेत सुजय विखेंचा पराभव झाला. या पराभवामुळे  बॅकफूटवर गेलेल्या विखेंना आता  पुन्हा एकदा राजेंद्र पिपाडांनी आव्हान दिलं आहे.  पण दुसरीकडे या सर्व गोष्टींवर सध्या विखे पाटील यांनी मौन बाळगणं पसंत केलं आहे.

पण  2019 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाच जागा पाडण्यामागे विखेपाटील असल्याचा आरोप राम शिंदे यांच्यासह भाजपच्या एका गटाने केला होता. त्यातच आता  2024 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पिपाडांनी पुन्हा एकदा विखे पाटलांविरोधात शड्डू ठोकल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर आगामी विधानसभेसाठी त्यांनी शिर्डी विधानसभेसाठी फिल्डिंग लावायलाही सुरूवात केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पिपाडांच्या या  आरोपांवर विखेपाटील काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेदेखील वाचा: भारतात टेलिग्रामवर बंदी येणार? सरकारचा तपास सुरु

Web Title: Bjp leader rajendra pipada made serious allegations against radhakrishna vikhe patil nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2024 | 09:19 AM

Topics:  

  • radhakrushna vikhe patil

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.