टेलिग्रामचे संस्थापक आणि सीईओ पावेल दुरोव यांच्या अटकेनंतर प्लॅटफॉर्मचा मार्ग कठीण होताना दिसत आहे. भारतातही टेलिग्रामचा मार्ग स्पष्ट होताना दिसत नाही आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार, भारत सरकारने टेलीग्रामविरोधात चौकशी सुरू केल्याचे समोर आले आहे. जर गोष्टी नियमानुसार नसतील तर भारतातही टेलिग्रामवर बंदी घालण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
इलॉन मस्क यांनीही पावेल दुरोवच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. मस्क म्हणाले की, इंस्टाग्रामवर बाल शोषणासारखी प्रकरणेही समोर आली आहेत, मात्र त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. कारण स्पष्ट आहे की मार्क झुकेरबर्ग सरकारच्या सूचनांवर काम करतो. सध्या, भारतात टेलिग्रामचे भविष्य काय असू शकते. कोणत्या अडचणी असू शकतात? याबद्दल आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत.
टेलिग्राम मेसेजिंग ॲपचा मार्ग कठीण होताना दिसत आहे. एकीकडे प्लॅटफॉर्मच्या सीईओला अटक झाल्याची बातमी आहे तर दुसरीकडे भारतात बंदी असल्याच्या बातम्या सुरु आहेत. मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, लोकप्रिय मेसेजिंग ॲपवर खंडणी आणि जुगार यासारख्या गुन्हेगारी ऍक्टिव्हिटींना प्रोत्साहन देण्याचा आरोप आहे. याप्रकरणी भारत सरकारने टेलिग्रामविरोधात चौकशी सुरू केल्याचे सांगण्यात आले. गोष्टी योग्य न आढळल्यास त्यावर बंदी घालता येईल.
भारत सरकारचे गृह मंत्रालय आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeetY) द्वारे चौकशी केली जात आहे. साहजिकच टेलिग्रामची भूमिका वेळोवेळी अनेक चुकीच्या कामांमध्ये दिसून आली आहे हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. अशा परिस्थितीत प्लॅटफॉर्मवर बंदी घालणे ही सरकारसाठी मोठी गोष्ट नाही, तपास यंत्रणांच्या प्राथमिक तपासावर भारतातील टेलिग्रामचे भवितव्य अवलंबून असेल. टेलिग्रामच्या गोपनीयतेवरही अनेकदा प्रश्नचिन्ह आले आहे.
फ्रान्समध्ये टेलिग्रामचे सीईओ पावेल डुरोव यांना अटक झाल्यानंतर लेगेचच एका दिवसानंतर ही चौकशी करण्यात आली आहे. वृत्तानुसार, फ्रान्सच्या OFMIN ने टेलिग्रामच्या सीईओला फसवणूक, अंमली पदार्थांची तस्करी, सायबर बुलिंग, गुन्हेगारी आणि दहशतवादाला प्रोत्साहन देण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. फ्रेंच अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सीईओ पावेल डुरोव्ह हे मॉडरेशन धोरणांची योग्य अंमलबजावणी करण्यात अयशस्वी ठरले.
हेदेखील वाचा – टेलिग्राम सिईओ Pavel Durov ला म्हटलं जातं Russian Zuckerberg! जाणून घ्या त्याच्या रहस्यमय जीवनाविषयी
पावेल डुरोवचे काय होणार? हा प्रश्न कायम आहे. त्यांच्याविरुद्ध सुरू असलेला तपास योग्य असल्यास त्यांना 20 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. त्याचबरोबर यावेळी त्यांना दंडही भरावा लागू शकतो.