Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pali Mayor Election : पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता यांचा विजय, शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव

अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची चूरशीची निवडणूक बुधवारी पार पडली . या निवडणुकीत पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता निवडून आले. यावेळी कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 10, 2025 | 04:05 PM
पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता यांचा विजय, शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव (फोटो सौजन्य-X)

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता यांचा विजय, शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची चूरशीची निवडणूक बुधवारी (10 सप्टेंबर) पार पडली आहे. या निवडणुकीत पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता निवडून आले. यावेळी नगरपंचायत कार्यालयाबाहेर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) आणि मित्रपक्ष यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत व ढोल ताशा वाजवत एकच जल्लोष केला.

एकूण 15 नगरसेवकांच्या मतांपैकी पराग मेहता यांना नऊ मते मिळाली, तर शिवसेनेच्या (शिंदे गट) कल्याणी दबके यांना पाच मते मिळाली. एक नगरसेवक तटस्थ राहिले. या निवडणुकीआधी बऱ्याच उलथापालथ झाल्या आहेत. भाजप व शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार एकमेकांसमोर थेट उभे होते. काही दिवसांपूर्वी तत्कालीन नगराध्यक्षा व नगरसेवक यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. त्यामुळे नगराध्यक्ष पद रिक्त होते. त्यामुळे बुधवारी (ता.10) नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून रोहा उपविभागीय अधिका ज्ञानेश्वर खुटवड यांनी काम पाहिले. तसेच पाली नगरपंचायत मुख्याधिकारी माधुरी मडके व इतर पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.

 पुन्हा धुमाकूळ! राज्यात पाऊस सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यांमध्ये करणार कहर

आजतागायत पाली नगरपंचायत मध्ये असंख्य राजकीय उलथापालथ होत असून, अवघ्या साडेतीन वर्षांत चौथ्या नगराध्यक्षाची निवड झाली आहे. नगराध्यक्षपदावर सतत होणारे बदल, नगरसेवक व नगराध्यक्ष यांचे सदस्यत्व रद्द होणे, तसेच पहिल्या नगराध्यक्षांचा राजीनामा, नगरसेवक पदासाठी पोटनिवडणुक आदी घडामोडी हे सर्व पालीच्या विकासकामांसाठी घातक ठरले आहेत. नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत शिवसेनेच्या (शिंदे गट) कल्याणी दबके व भाजपचे पराग मेहता दोनच उमेदवार असून महायुतीमध्येच नगराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच झाली. असे म्हटले जाते की निवडणुकीच्या आदल्या कोणत्या पक्षाचा नगरसेवक कुठे जाईल आणि काय करतोय याकडे पक्षश्रेष्ठी व पदाधिकारी, नेते यांचे लक्ष होते. शिवाय मतदानाच्या दिवशी पक्षादेश पाळला जाईल की नाही याकडेही सर्वांचे डोळे लागले होते. भाजपचे राज्यस्तरीय पदाधिकारी देखील या निवडणुकी कडे जातीने लक्ष देऊन होते. भाजपचे खासदार धैर्यशील पाटील आवर्जून पाठपुरावा करत होते. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) खासदार सुनील तटकरे व माजी आमदार अनिकेत तटकरे हेदेखील या सर्व प्रक्रियेमध्ये लक्ष ठेवून होते.

निवडणुकीच्या एक दिवस आधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) नगरसेविका नलिनी म्हात्रे यांनी नगराध्यक्ष पदासाठी भरलेला अर्ज मागे घेतला व भाजपचे पराग मेहता यांना पाठिंबा दर्शवला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) सुधागड तालुका अध्यक्ष संदेश शेवाळे यांनी देखील पक्षाच्या वतीने भाजपचे उमेदवार पराग मेहता यांना पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपचे पारडे जड झाले. मात्र त्या दिवशी काही नगरसेवक नॉट रिचेबल असल्यामुळे नक्की कोणता चमत्कार घडेल, कोण नगराध्यक्ष होईल या चर्चांना उधाण आले होते.

पाली नगरपंचायतीत एकूण 17 सदस्य असून 2 सदस्यांचे सदस्यत्व काही दिवसांपूर्वी रद्द झाले आहे.
सध्याची आकडेवारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 5 नगरसेवक, शिवसेना (शिंदे गट) 5 नगरसेवक, भाजप 4 नगरसेवक आणि शेकाप 1 नगरसेवक अशी पक्षीय बलाबल आहे. पाली नगरपंचायत च्या निवडणुकीमध्ये पराग मेहता हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

राज्य व देश पातळीवर भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) अशी महायुती एकत्र असली तरी पाली नगरपंचायतीत मात्र एकी साधली नसल्याने भाजप व शिवसेना (शिंदे गट) या दोघांत थेट लढत झाली आहे.

Shrikant Shinde : “अंतरात्म्याचा आवाज ऐकू आला का…”, श्रीकांत शिंदे यांची राहुल गांधींवर टीका

Web Title: Bjp parag mehta won the election for the position of palghar municipal chairperson defeating the shiv sena candidate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 04:05 PM

Topics:  

  • Election
  • maharashtra

संबंधित बातम्या

Yavatmal News : गावाची लोकसंख्या १५००, तरीही तीन महिन्यांत २७,३९७ नवजात बाळांचा जन्म? भाजप नेत्याची चौकशीची मागणी
1

Yavatmal News : गावाची लोकसंख्या १५००, तरीही तीन महिन्यांत २७,३९७ नवजात बाळांचा जन्म? भाजप नेत्याची चौकशीची मागणी

Panvel Municipal Corporation: पनवेल महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज…
2

Panvel Municipal Corporation: पनवेल महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज…

महापौर पदाला प्रतिष्ठा; पण इचलकरंजीत पहिल्या महापौराला शासकीय बंगल्याविना कारभार?
3

महापौर पदाला प्रतिष्ठा; पण इचलकरंजीत पहिल्या महापौराला शासकीय बंगल्याविना कारभार?

Maharashtra Politics : “कवडीमोल विकण्यापेक्षा स्वाभिमानी आंबेडकरी बाण्याने मतदान करा…”, अंजली आंबेडकर यांचे आवाहन
4

Maharashtra Politics : “कवडीमोल विकण्यापेक्षा स्वाभिमानी आंबेडकरी बाण्याने मतदान करा…”, अंजली आंबेडकर यांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.