Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विदर्भात भाजपला खिंडार; भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटात घरवापसी 

गेल्या काही दिवसांपासून रमेश कुंथे भाजप नेत्यांवर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मधल्या काळात त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेटही घेतली होती. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण त्यांनी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला. कुंथे यांच्या या पक्षप्रवेशामुळे भाजपला फटका बसणार असला तरी विदर्भात ठाकरे गटाची ताकद वाढणार असल्याचे दिसत आहे.  

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 26, 2024 | 11:45 AM
विदर्भात भाजपला खिंडार; भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटात घरवापसी 
Follow Us
Close
Follow Us:

गोंदिया: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकांच्य निकालानंतर राज्यातील अनेक बड्या नेतेमंडळी महायुती आणि भाजपला रामराम करताना दिसत आहे. अशातच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भात भाजपला खिंडार पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील भाजपचे एक बडा नेता भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहे.

गोंदियाचे माजी आमदार आणि भाजपचे नेते रमेश कुंथे हे आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. कुंथे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे विदर्भात ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे. पण भाजपला पुन्हा मोठा फटकाही बसणार आहे.

भाजपचे नेते रमेश कुंथे हे आज ठाकरे गटात प्रवेश करत घरवापसी करणार आहेत. आज दुपारी साडेबारा वाजता उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर  हा पक्षप्रवेश पार पडेल. 2018 साली रमेश कुथे यांनी शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण आज  रमेश कुंथे यांची घरवापसी होणार आहे.

रमेश कुंथे  हे १९९५ आणि १९९९ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते. त्यानंतर ते काही काळ राजकारणापासून दूरही राहिले. त्यानंतर 2018 साली त्यांनी  उद्धव ठाकरेंची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीतील अनेक नेत्यांनी पुन्हा ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. यामुळे  भाजपच्या अडचणीही वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रमेश कुंथे भाजप नेत्यांवर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मधल्या काळात त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेटही घेतली होती. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण त्यांनी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला. कुंथे यांच्या या पक्षप्रवेशामुळे भाजपला फटका बसणार असला तरी विदर्भात ठाकरे गटाची ताकद वाढणार असल्याचे दिसत आहे.

 

Web Title: Bjp powerful leader in vidarbh will enter in uddhav thackeray sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2024 | 11:42 AM

Topics:  

  • Uddhav Thackeray
  • Vidarbha Politics

संबंधित बातम्या

Sanjay Raut News: ‘विरोधी पक्षनेत्यापासून वेगळ्या विदर्भापर्यंत…; संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले
1

Sanjay Raut News: ‘विरोधी पक्षनेत्यापासून वेगळ्या विदर्भापर्यंत…; संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले

Maharashtra Politics : ‘उपमुख्यमंत्रिपद हे संवैधानिक पद नसले तरी ते…’; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विधान
2

Maharashtra Politics : ‘उपमुख्यमंत्रिपद हे संवैधानिक पद नसले तरी ते…’; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विधान

Shivsena News:  भाजपला मोठा धक्का! मंडल सरचिटणीस यांचा शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश
3

Shivsena News: भाजपला मोठा धक्का! मंडल सरचिटणीस यांचा शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश

Uddhav Thackeray : विधीमंडळातील विरोधी पक्षनेते पदाचा मार्ग होणार मोकळा? उद्धव ठाकरेंनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट
4

Uddhav Thackeray : विधीमंडळातील विरोधी पक्षनेते पदाचा मार्ग होणार मोकळा? उद्धव ठाकरेंनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.