
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत गणितं बदलणार (फोटो सौजन्य - Social Media)
महापालिकेच्या निवडणुकांमध्ये मुंबई आणि अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांची युती सर्वांना पहायला मिळाली. तर काही ठिकाणी चक्क काँग्रेस आणि भाजपचीही युती झाली होती. तर मुंबईत मनसे आणि उद्धव ठाकरे शिवसेना एकत्र आले. मात्र त्यांच्या स्वप्नानुसार त्यांना यश मिळू शकलेले नाही. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्यी निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. तर चक्क इथे संपूर्ण गणित बदललं आहे.
Maharashtra Politics: “… आज बाळासाहेब नाहीयेत ते बरंय”; मनसे अध्यक्ष राज ठाकरे कडाडले
राजकीय घडामोडींना वेग
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ५ फेब्रुवारी रोजी असून ७ फेब्रुवारीला याची मतमोजणी होणार आहे. पण आता चक्क सोलापूर जिल्ह्यातील बार्शीनंतर माढ्यातदेखील दोन्ही शिवसेना एकत्र येत आहेत आणि यामुळे भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. या दोन्ही गटाची युती झाल्याने आता पुढे नक्की काय? असा प्रश्नही जनतेसमोर आणि राजकारणातील अनेक दिग्गजांसमोरही असल्याचे दिसून येत आहे. BJP च्या पॅनलविरोधात हे पक्ष एकत्र आल्याने आता पूर्ण खेळीच उलटली आहे.
कसे आहे पॅनल
सोलापूरमधील माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार अभिजीत पाटील या दोघांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल तयार करण्यात आल्याचं आता समोर आलं आहे. इतकंच नाही तर या ठिकाणीच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही एकत्र आले होते. त्यामुळे आता भाजपसमोर या चारही पक्षाचे आव्हान उभं ठाकलंय. BJP सत्तेपासून दूर रहावी यासाठी ही मोठी खेळी खेळण्यात आली आहे.
२६ जानेवारीला प्रचाराचा शुभारंभ
इतकंच नाही तर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी माढ्यामधील रांझणीमध्ये विजयसिंह मोहित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे आणि याशिवाय भाजपच्या विरोधात कशा पद्धतीने लढा देण्यात येईल याचाही विचार करण्यात येईल. भाचपसमोर टिकाव लागण्यासाठी इथे वेगळेच डावपेच आखले जात आहेत आणि आता यावर भाजप नक्की काय पाऊल उचलणार हेदेखील बघावं लागणार आहे.
Maharashtra Politics : मनसेच्या ‘त्या’ निर्णयाने राजकारणात मोठी खळबळ; उद्धव ठाकरेंचीही तीव्र नाराजी