Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंढरपूरमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद मिटला; ‘या’ दोन नेत्यांमध्ये समेट घडविण्यात प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना यश

भाजपाने ज्या ज्या वेळी संघी दिली त्या त्यावेळी निवडणूक लढविली. यावेळी देखील कार्यकत्यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार आपण गावभेट दौरे केले. पक्ष आणि निष्ठा महत्वाची आहे.असे परिचारक म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 27, 2024 | 05:00 PM
पंढरपूरमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद मिटला; 'या' दोन नेत्यांमध्ये समेट घडविण्यात प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना यश

पंढरपूरमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद मिटला; 'या' दोन नेत्यांमध्ये समेट घडविण्यात प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना यश

Follow Us
Close
Follow Us:

पंढरपूर/शेखर गोतसुर्वे: राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील सर्वच पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या याद्या देखील जाहीर केल्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी सायंकाळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांची त्यांच्या पंढरपुरातील तुळशी वृंदावन शेजारील निवासस्थानी भेट घेतली. ही भेट घेत असताना भाजपाकडून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात आ. समाधान आवताडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यादरम्यान, पंढरपुरात असलेल्या आ. समाधान आवताडे यांनी बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रशांत परिचारक, उमेश परिचारक व पांडुरंग परिवारातील प्रमुख पदाधिकारी यांची भेट घेतल्याने भाजपाकडून परिचारक व आ. आवताडे यांच्यात समेट घडविण्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यशस्वी झाले.

परंतु, गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात भाजपाकडून उमेदवारीसाठी आ. समाधान आवताडे यांचे नाव चर्चेत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढा येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या कार्यक्रमात याबाबतचे सुतोवाच केले होते. यानंतर माजी आमदार प्रशांत परिचारक काय भूमिका घेणार? अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार का? याबाबत चर्चा सुरू होत्या. परिचारक यांनी मतदारसंघात आपला एक दौराही पूर्ण केला होता. यादरम्यान काही ठिकाणी तुतारी हाती घ्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याचे समोर आले होते. यामुळे परिचारक भाजपासोबत राहणार की अपक्ष लढणार? अशी चर्चा सुरू झाली होती. यामुळे भाजपाकडून वरिष्ठ पातळीवर् सुत्रे हलवित शनिवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाचारण करण्यात आल्याचे दिसून आले.

परिचारक यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीस भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, शहाजी पवार, उमेश परिचारक, रोहन परिचारक, सतीश मुळे, दिलीप घाडगे, दिनकर मोरे, राजूबापू गावडे, कैलास खुळे, हरिष गायकवाड, सुभाष माने, रा.पा. कटेकर, गणेश अधटराव, तानाजी वाघमोडे, लक्ष्मण शिरसट, अनिल अभंगराव, भास्कर कसगावडे, संतोष घोडके, लक्ष्मण धनवडे, संग्राम अभ्यंकर, धर्मराज घोडके आदी उपस्थित होते.

हेही वाचा: Devendra Fadanvis: “देवाभाऊ जो बोलता है, वो करता है, और…”; रावडी डायलॉग हाणत फडणवीसांनी दिला सत्ता बदलाचा दाखला
आमदार आवताडे – परिचारक एकत्रच काम करणार
माजी आमदार प्रशांत परिचारक हे भाजपामध्येच राहणार आहेत. भाजपा व सहकार वाढीसाठी आ. समाधान आवताडे व प्रशांत परिचारक हे एकत्र येऊन काम करतील. मतभेदाचा विषय राहिलेला नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत दोघांमध्ये समेट घडून आला असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पक्षनिष्ठा महत्वाची, आमदारकी नाही
भाजपाने ज्या ज्या वेळी संघी दिली त्या त्यावेळी निवडणूक लढविली. यावेळी देखील कार्यकत्यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार आपण गावभेट दौरे केले. माझ्यापुढे अनेक पर्याय होते. पक्ष आणि निष्ठा महत्वाची आहे. नेतृत्वाची निष्ठा यावर मी आजही ठाम आहे. पक्ष म्हणून जो आदेश येईल त्याप्रमाणे काम केले जाईल. आमच्यासाठी आमदारकी महत्वाची नसल्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले.

Web Title: Bjp president chandrshekhar bawankule solved problem between autade and paricharak pandhapur maharashtra election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2024 | 05:00 PM

Topics:  

  • Chandrasekhar Bawankule
  • Maharashtra Assembly election 2024
  • Samadhan Autade

संबंधित बातम्या

आगामी निवडणुकीसाठी भाजप कोणाकोणाला उमेदवारी देणार? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
1

आगामी निवडणुकीसाठी भाजप कोणाकोणाला उमेदवारी देणार? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.