
BMC Election 2026, BMC Election Result 2026, BMC Election Result 2026 Live Updates,
रुद्र रिसर्च अँड अॅनालिटिक्सच्या अंदाजानुसार, राज्यातील सर्व २९ महापालिकांच्या एक्झिट पोलची आकडेवारी मांडली आहे. त्यानुसार महायुती बाजी मारणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पण त्याचवेळी लातूर आणि कोल्हापूरमध्येच काँग्रेस जिंकण्याची संधी वर्तवण्यात आली आहे.
एक्झिट पोलच्या विश्लेषणानुसार, या निवडणुकीत जातीपातीची आणि प्रादेशिक गणिते महत्त्वाची ठरली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) आणि राज ठाकरे यांच्या मनसेला मराठा तसेच मुस्लिम मतदारांचा मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. दुसरीकडे, उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय मतदारांनी आपला कौल स्पष्टपणे भाजपच्या बाजूने दिल्याचे चित्र आहे.
मुंबई महापालिकांसाठी अॅक्सिस माय इंडिया, जे.व्ही.सी, जनमत आणि डीव्ही रिसर्च, या पाच संस्थांच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला बहुमत असल्याचे दिसून येत आहे. जनमत आणि जेव्हीसीच्या अंदाजानुसार मुंबई महापालिकेवर भाजप आणि शिंदे गटाने बाजी मारल्याचे दिसून येत आहे. या पोलनुसार, मुंबईत भाजपल आणि शिवसेनेला १३८ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
अॅक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार महायुतील मुंबईत 131 ते 152 जागा मिळतील, असा अंदाज आहे. तर जनमतच्या पोलनुसार ठाकरे बंधू आणि पवारांच्या राष्ट्रवादीला 62 जागा मिळण्याचा अंदाज आहे. डीव्ही रिसर्चच्या एक्झिट पोलनुसार शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 68 ते 83 जागा मिळू शकतात. तरतर प्रोबच्या अंदाजानुसार ठाकरे गट आणि मनसेला 52 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
एक्झिट पोलनुसार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त शिवसेना (यूबीटी) आणि मनसेला मराठा आणि मुस्लिम मतांचा फायदा होण्याची शक्यता आहे, तर उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय मतदारांनी भाजपला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे.
जेव्हीसी एक्झिट पोलनुसार, भाजपला १३८ जागा मिळण्याची अपेक्षा आहे, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना (यूबीटी) आणि राज ठाकरेंची मनसे एकत्रितपणे ५९ जागा जिंकण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला २३ जागा मिळण्याचा अंदाज आहे. सकाळ माध्यम समुहाच्या एक्झिट पोलनुसार, भाजप आणि शिवसेना ११९ जागा जिंकू शकतात, तर शिवसेना (यूबीटी) ७५ जागा जिंकू शकते. काँग्रेसला २० पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज आहे.