Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMC कडे 81 हजार कोटी रुपयांच्या ठेवी; विकासकामांसाठी टप्प्याटप्प्याने वापरणार…! महापौर रितू तावडेंचे आश्वासन

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मुंबई महापालिकेतील ठेवी आणि फेरी वाले विक्रेते यांच्या नवीन सर्टिफिकेट बाबत भूमिका स्पष्ट केली आहे. ठेवींचा वापर हा टप्प्याटप्प्याने केला जाईल असे देखील त्या म्हणाल्या आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 02, 2026 | 11:22 AM
BMC Mayor Ritu Tawde on money deposited used for development works in phases mumbai news

BMC Mayor Ritu Tawde on money deposited used for development works in phases mumbai news

Follow Us
Close
Follow Us:
  • मुंबईच्या ठेवीवरुन रंगलं राजकारण
  • महापौर रितू तावडे यांनी स्पष्टपणे मांडली भूमिका
  • विकास कामांसाठी टप्प्याटप्याने वापर होणार
BMC News : मुंबई : सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबईच्या ठेवीवरुन राजकारण सुरु झाले आहे. या ठेवींचा भाजप गैरवापर करेल असा दावा शिवसेना ठाकरे गटाकडून (Thackeray Group) केला जात आहे. मात्र याचा वापर हा विकास कामांसाठी टप्प्याटप्याने केला जाईल, असे आश्वासन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिले आहे. (BMC News)

बीएमसीच्या आर्थिक परिस्थिती, फेरीवाला धोरण आणि मराठी भाषेबाबत महापौर रितू तावडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. महापौरपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी स्पष्ट केले की, विकास कामे सुरू असूनही महापालिकेचे आर्थिक आरोग्य मजबूत राहील. तसेच बीएमसीकडे सध्या अंदाजे ₹८१,००० कोटींच्या मुदत ठेवी आहेत. यापैकी अंदाजे ₹३६,००० कोटी विविध विकास प्रकल्पांसाठी राखीव आहेत, परंतु याचा अर्थ असा नाही की संपूर्ण रक्कम एकाच वेळी खर्च केली जाईल. ही रक्कम टप्प्याटप्प्याने वापरली जाईल. गरजेनुसार टप्प्याटप्प्याने निधी वापरला जाईल. भविष्यात ठेवी अधिक मजबूत करण्यासाठी महसूल वाढवण्याचे प्रयत्न देखील केले जातील, अशी माहिती रितू तावडे यांनी दिली आहे.

हे देखील वाचा : VSR च्या मालकांची विमानामध्ये डुलकी; जय पवारांनी शेअर केला धक्कादायक व्हिडिओ

फेरीवाल्यांसाठी क्यूआर कोड असलेली ओळखपत्रे

फेरीवाल्यांबाबत मुंबई महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याबाबत महापौरांनी सांगितले की, बीएमसी एक नवीन प्रणाली लागू करत आहे ज्या अंतर्गत नोंदणीकृत फेरीवाल्यांना क्यूआर कोड असलेली ओळखपत्रे दिली जातील. या क्यूआर कोडमध्ये फेरीवाल्याचा फोटो, आधार, पॅन आणि परवाना माहिती असेल. यामुळे केवळ अधिकृत व्यक्तीच फेरीवाले व्यवसाय चालवतील याची खात्री होईल. जर कोणी त्यांची जागा दुसऱ्याला भाड्याने देताना आढळले तर त्यांचे प्रमाणपत्र रद्द केले जाऊ शकते.

हे देखील वाचा: Iran Israel युद्धामुळे भारत ॲलर्ट! पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बोलावली CCS बैठक; मध्य पूर्वेतील तणाव शिगेला

मराठी भाषेबाबत रितू तावडे यांनी कडक भूमिका घेतली आहे. त्यांनी सांगितले की, महापालिकेचे काम पूर्णपणे मराठीतच करावे. महाराष्ट्राबाहेरील अधिकाऱ्यांनीही मराठीतच पत्रके आणि परिपत्रके जारी करावीत, अन्यथा कारवाई केली जाईल. त्याच कंत्राटदारांना वारंवार काम दिल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

रितू तावडे घड्याळ्यामुळे झाल्या ट्रोल 

नेटकऱ्यांनी रितू तावडे यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. सोशल मीडिया त्या ट्रोल देखील झाल्या. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन या घड्याळ्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. रितू तावडे यांनी घड्याळाचा फोटो पोस्ट करत हे घड्याळा Rolex कंपनीचे नसल्याचे स्पष्ट केले आहे. रितू तावडे यांनी लिहिले आहे की, ही पोस्ट पूर्णपणे खोटी व दिशाभूल करणारी आहे.माझ्या हातातील घड्याळ Michael Kors कंपनीचे आहे, ते Rolex Daytona नाही. त्यामुळे लाखो-कोट्यवधींचा प्रश्नच उद्भवत नाही.अफवा पसरवणे हा बेजबाबदारपणा आणि जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न आहे.अशा खोट्या आरोपांना मी भीक घालत नाही, अशी आक्रमक पोस्ट मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केली आहे.

 

Web Title: Bmc mayor ritu tawde on money deposited used for development works in phases mumbai news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 11:22 AM

Topics:  

  • BMC Election 2026
  • political news
  • Thackeray Group

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik : मीरा-भाईंदरचे राजकारण तापले; आरोप-प्रत्यारोपांची पातळी घसरली, सरनाईक-मेहता आमनेसामने
1

Pratap Sarnaik : मीरा-भाईंदरचे राजकारण तापले; आरोप-प्रत्यारोपांची पातळी घसरली, सरनाईक-मेहता आमनेसामने

Karjat News : शेतकऱ्यांचा अडवला रस्ता अन्… मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सुपुत्राचा पराक्रम; नेमकं घडलं तरी काय ?
2

Karjat News : शेतकऱ्यांचा अडवला रस्ता अन्… मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सुपुत्राचा पराक्रम; नेमकं घडलं तरी काय ?

Satara Zilla Parishad : सातारा जिल्हापरिषद सभेकडे सर्वांच्याच नजरा; सभा शांततेत होणार की वादळी होणार?
3

Satara Zilla Parishad : सातारा जिल्हापरिषद सभेकडे सर्वांच्याच नजरा; सभा शांततेत होणार की वादळी होणार?

कोरेगावात शंभूराज देसाईंची ‘चाल’ सुरु; महेश शिंदेंसमोर पर्याय उभा करण्याची रणनिती तापली
4

कोरेगावात शंभूराज देसाईंची ‘चाल’ सुरु; महेश शिंदेंसमोर पर्याय उभा करण्याची रणनिती तापली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.