'आपल्याला आपला 'हात' भारी, दुसऱ्याला लाथ...'; रितेश देशमुख यांची लातूरच्या सभेत तुफान फटकेबाजी
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता झाली. त्याआधी लातूरमध्ये बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याची प्रचार सभा झाली. या सभेत त्याची जोरदार फटकेबाजी पहायला मिळाली. कोणत्याही पक्षावर किंवा कोणत्याही नेत्यावर त्यांने आरोप करण्याचं टाळत विलासराव देशमुख यांच्या स्वप्नातील शिक्षणाचा लातूर पॅटर्नही पुढे नेण्याचं आवाहन त्याने यावेळी केलं.
लातूर पॅटर्नमध्ये शिक्षणाचा पॅटर्न आहे आणि याला कोणी मोठं केलं असेल तर ते मोटेगावकर यांच्यासारख्या माणसांनी. तुमच्या डोळ्यात मला स्वप्न दिसतात. काहीतरी करायचं आहे, असं इथल्या प्रत्येक तरुणाला वाटतं. त्यासाठी सतत प्रयत्नशिल रहा. लातूर शहराचा, हक्काचा आणि तुमच्या प्रेमामुळे एकच बीग बॉस आहे. ते म्हणजे अमित देशमुख, असं म्हणतातच समोरून एकच जल्लोष झाला.
लातूर पॅटर्न विलासराव देशमुख यांनी सुरू केला होता, त्याला पुढे नेण्याचं काम अमित देशमुख यांनी केलं आहे. त्यामुळेच आपल्या सर्वांना कुठेही गेलं तरी लातूर कायम लक्षात राहिलं पाहिजे.आपण एक झाडं लावतो, ते हळूहळू मोठं होतं. तेव्हा आता १५ वर्षांनंतर आता त्या झाडाला फळं लागण्याची वेळ आली आहे.
रितेश देशमुख यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेली त्याने आपल्याला आपला हात भारी, दुसऱ्याला लाथ भारी, आणि यावेळी आपलं लिड भारी असं, म्हणतात समोरून शिट्टयांचा आवाज आणि टाळ्याचा कडकडाट झाला.