
(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)
बिग बॉस मराठी ६ हे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालं आहे. हा नवाकोरा सीझन सुरू होण्यासाठी आता अवघे 72 तास उरले आहेत. या पर्वातील स्पर्धकांबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. कलर्स मराठीने बिग बॉसचे काही प्रोमो शेअर करण्यात आले आहेत.या प्रोमोमध्ये स्पर्धकांची झलक चाहत्यांना दिसली आहे. त्यात स्पर्धकांचा चेहरा दिसत नसला तरी प्रेक्षकांनीही फक्त प्रोमो पाहूनच ते स्पर्धक कोण आहेत. याबद्दल शोध लावला आहे.
नुकताच कलर्स मराठीने शेअर केलेल्या एका प्रोमोमध्ये बोल्ड अंदाजात एक सौंदर्यवती दिसत आहे. हिरव्या रंगाची साडी नेसलेल्या या अभिनेत्रीच्या हातावर टॅटू असल्याचं पाहायला मिळत आहे. या टॅटूमुळे ही स्पर्धक कोण असल्याचं प्रेक्षकांनी आधीच ओळखलं आहे. या प्रोमोवर प्रेक्षकांनी अनेक कमेंट्स करत अनेक अभिनेत्रींची नावं घेतली आहेत. यात जवळपास अनेकांनी ही दिपाली सय्यद असल्याचं देखील म्हटलंय. कलर्स मराठीने शेअर केलेल्या पोस्टवर, आपल्या नजरेने प्रेक्षकांच्या हृदयावर हल्ला करायला आणि घर गाजवायला येतेय ही सौंदर्याची फूलनदेवी!असं कॅप्शन देखील देण्यात आलं आहे.
नवे समोर आल्यानंतर या घरात आणखी कोण कोणते स्पर्धक एन्ट्री करणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत, ‘बिग बॉस मराठी सीझन ६’ येत्या ११ जानेवारी पासून रात्री ८ वाजता कॉलर्स मराठीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. तसेच हा शो जिओ हॉटस्टारवर देखील प्रसारित केला जाणार आहे.
दिपाली सय्यदनं हिंदी, मराठी चित्रपट, मालिका, जाहिराती आणि नाटकांमध्ये काम करुन चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. सध्या ती राजकारणात सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं.