Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“छत्रपती शंभूराजांची बदनामी करणाऱ्या साहित्यिकावर बहिष्कार टाका”; विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या सदस्यांची मागणी

छत्रपती संभाजीराजांची बदनामी करणाऱ्या माणसाच्या अध्यक्षपदाखाली होणाऱ्या साहित्यसंमेलनावर बहिष्कार टाकावा असा ठराव मंजूर करण्याची मागणी होत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 29, 2025 | 05:27 PM
“छत्रपती शंभूराजांची बदनामी करणाऱ्या साहित्यिकावर बहिष्कार टाका”; विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या सदस्यांची मागणी
Follow Us
Close
Follow Us:
  • छत्रपती संभाजीराजांची बदनामी करणाऱ्या साहित्यिकावर बहिष्कार टाका
  • विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या सदस्यांची मागणी
सातारा : छत्रपती संभाजीराजांची बदनामी करणाऱ्या माणसाच्या अध्यक्षपदाखाली होणाऱ्या आणि शोषित बहुजन समाजाच्या जीवनातील सुखदुःखाची, कलांची, निर्मिती क्षमतेची, जगण्या-मरण्याची आणि रथर घालमोड्या दादांच्या साहित्य संमेलनावर महाराष्ट्रातील जनतेने बहिष्कार टाकावा असा ठराव निरंजन टकले यांच्या व्याख्यानाच्या सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. अध्यक्षस्थानी असलेल्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राष्ट्रीय समन्वय समितीचे सदस्य डॉ. भारत पाटणकर यांनी हा ठराव मांडला. ते म्हणाले की, विद्रोही सांस्कृतिक चळवळीची स्थापना महात्मा जोतिबा फुले यांनी, ११ जून १८८५ रोजी मराठी ग्रंथकार सभेच्या पत्राच्या आधारे झाली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, त्या दादांना जरसर्वांची एकी करणे असेल, तर त्यांनी एकंदर सर्व मानवी प्राण्यात परस्पर अक्षय बंधुप्रीती काय केल्याने वाढेल, त्याचे बीज शोधून काढावे व ते पुस्तकाद्वारे प्रसिद्ध करावे. अशा वेळी डोळे झाकणे उपयोगाचे नाही.

या उपर त्या सर्वांची मर्जी. हे माझे अभिप्रायादाखल छोटेखानी पत्र त्या मंडळींच्या विचारा करिता तिजकडे पाठवण्याची मेहेरबानी करावी. साधे होके बुट्टेका येत पहिला सलाम लेव.₹ या पार्श्वभूमीवर आजची परिस्थिती पाहिली तर त्या काळापेक्षाही वाईट झा ली आहे. बुद्ध, अश्वघोष, धर्म किर्ती या बौद्ध दार्शनिक मार्गदर्शकांपासून पुढे कबीर, रविदास, नामदेव, ज्ञानदेव, एकनाथ, तुकाराम, गोरा कुंभार, सावता माळी, जनाबाई, सोयराबाई, चोखा मेळा, कर्ममेळा, मुक्ताबाई अशी संतपरंपरा या देशाला आहे. बसवाण्णांची अनुभव मंटप परंपरा आहे.

Kolhapur News : लेखक-कवी घडवणारा आदर्श उपक्रम ; मराठी साहित्य संमेलनातून विद्यार्थ्यांच्या करियरला नवी दिशा

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज ते भारतवर्षाचे शेवटचे सम्राट शंभु पुत्र शाहू महाराज ते थोरले प्रतापसिंह महाराज अशीही परंपरा आहे. या उलट घालमोड्या दादांची आजची परंपरा, या इतिहासाला अंधारात घालणारी आहे. मनुस्मृती सारखी, बहुजन जाती जमाती आणि स्त्रियांच्या शोषणावर आधारित व्यवस्था पुन्हा या देशात राबवणारीआहे. त्यासाठी इतिहासाला विकृत करून खरा इतिहास गायब करण्याची आहे. त्यामुळेच घालमोड्या दादांच्या साहित्य संमेलनावर बहिष्कार घातला पाहिजे.

त्या साडेतीनचार टक्यांना सरकारने जे आपल्याकडून कर रूपाने घेतलेले, प्रचंड पैसे दिले आहेत ते त्यांनी सङ्ख्या स्वतः वर उधळू दे, असेही त्यांनी सांगितले, सभागृहात जमलेल्या प्रतिनिधीनी हा ठराव एकमताने मंजूर केला आणि प्रचंड संख्येच्या जनसहभागाने विद्रोही साहित्य संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला, यामधे तरुण-तरुणींची संख्या लक्षणीय होती. यावेळी पद्मश्री लक्ष्मण माने, कॉ धनाजी गुख, डॉ सुहास महाराज फडतरे, एडवोकेट सुभाष बापू पाटील, एडवोकेट वर्षा देशपांडे, व इतर मान्यवर उपस्थित होते.

Kolhapur News : लेखक-कवी घडवणारा आदर्श उपक्रम ; मराठी साहित्य संमेलनातून विद्यार्थ्यांच्या करियरला नवी दिशा

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा ठराव कुठे आणि कधी मंजूर करण्यात आला?

    Ans: सातारा येथे निरंजन टकले यांच्या व्याख्यानाच्या सभेत हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

  • Que: ठराव नेमका कोणत्या विषयावर होता?

    Ans: छत्रपती संभाजीराजांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या घालमोड्या दादांच्या साहित्य संमेलनावर महाराष्ट्रातील जनतेने बहिष्कार टाकावा, असा ठराव मंजूर करण्यात आला.

  • Que: ठरावामागील मुख्य कारण काय सांगण्यात आले?

    Ans: संबंधित साहित्य संमेलन बहुजन समाजाच्या इतिहासाला अंधारात घालणारे, छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारे आणि मनुस्मृतीवर आधारित शोषणात्मक विचारधारा पुढे नेणारे असल्याचा आरोप करण्यात आला.

Web Title: Boycott the literary figure who defames chhatrapati shambhuraj demand of members of the vidrohi cultural movement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 05:27 PM

Topics:  

  • Satara News

संबंधित बातम्या

वाई येथील किसन वीर महाविद्यालयाच्या परिसरात आढळला दुर्मिळ ‘मून मॉथ’; सर्वांचे वेधले लक्ष
1

वाई येथील किसन वीर महाविद्यालयाच्या परिसरात आढळला दुर्मिळ ‘मून मॉथ’; सर्वांचे वेधले लक्ष

Satara Politics : अमोल मोहिते यांनी स्वीकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीची अखेर
2

Satara Politics : अमोल मोहिते यांनी स्वीकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीची अखेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.