Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : ‘जय जय रघुवीर समर्थ’चा जयघोष; सज्जनगडावर दासनवमी उत्साहात साजरी, 9 दिवस रामनामाचा गजर

राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या आणि त्यांची समाधी स्थळ असलेल्या सज्जनगडावर माघ महिन्यातील गुरू प्रतिपदेपासून, २ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या दासनवमी महोत्सवाची बुधवारी सांगता झाली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 13, 2026 | 07:07 PM
Satara News :  ‘जय जय रघुवीर समर्थ’चा जयघोष; सज्जनगडावर दासनवमी उत्साहात साजरी, 9 दिवस रामनामाचा गजर
Follow Us
Follow Us:
  • ‘जय जय रघुवीर समर्थ’चा जयघोष;
  • सज्जनगडावर दासनवमी उत्साहात साजरी
सातारा : राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या आणि त्यांची समाधी स्थळ असलेल्या सज्जनगडावर माघ महिन्यातील गुरू प्रतिपदेपासून, २ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या दासनवमी महोत्सवाची बुधवारी सांगता झाली असून यात्रेचा हा मुख्य दिवस होता. दरम्यान, गेल्या नऊ दिवसांपासून गडावर रामनामाचा गजर सुरू होता.अनेक नामवंतांची कीर्तन, प्रवचन, भजन गायन सेवा गडावर सुरू होती. बुधवारी पहाटे दोन वाजता समाधी मंदिरात काकड आरती, यानंतर पहाटे चार वाजता श्री समर्थ समाधी महापूजा, सकाळी साडेसहा वाजता सज्जनगड गावातून सांप्रदायिक भिक्षा असे कार्यक्रम पार पडले. विशेष पूजेमध्ये समर्थांची समाधी अनेक सुवासिक गुलाब, चाफा, मोगरा, शेवंती, जास्वंद फुलांनी सुशोभित करण्यात आली होती. तसेच समाधीच्या वरील बाजूस मोगऱ्याच्या फुलांच्या माळा लक्ष वेधून घेणाऱ्या होत्या. समर्थ समाधीवरील श्रीराम मूर्तीनाही फुलांची तसेच पुष्पहार याची विशेष सजावट करण्यात आली होती.

प्रदक्षिणा घालताना वेगळाच नजारा
सांप्रदायिक भिक्षेमध्ये समर्थ रामदास स्वामींचे वंशज, महत, मठपती,मानकरी उपस्थित होते. स. १०.३० वा. आरती, छबीना मानाच्या १३प्रदक्षिणा झाल्या. यावेळी रामा, रामा हो रामा… असे पद म्हणतरामदास स्वामी संस्थान, श्री समर्थ सेवा मंडळाचे पदाधिकारी, मानकरीतसेच हजारो समर्थ भक्त मंदिराला प्रदक्षिणाघालताना एक वेगळाचनजारा पाहायला मिळत होता. दु. १२ वा. सुरेशबुवा सोन्ना रामदासी श्रीसमर्थ निर्वाण कथा समर्थ भक्त कथन करताना अनेकांचे डोळे पाणावलेहोते.समर्थाच्या शेजघरापुढील भव्य मंडपामध्ये ही कथा ऐकताना हजारोसमर्थ भक्तांनी गर्दी केली होती. दुपारी साडेबारापासून संस्था आणिसमर्थ सेवा मंडळाच्या वतीने महाप्रसादाच्या आयोजनामध्ये हजारो समर्थ भक्तांनी भात, आमटी तसेच खिरीचा प्रसाद घेऊन तृप्त मनाने गड
उतरण्यास सुरुवात केली. रात्री साडेनऊ वाजता कीर्तनसेवा झाली.

भक्तनिवास येथील श्रीसमर्थ दासबोध ग्रंथ पारायणाची सांगता
श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगडच्या वतीनेही श्रीधर कुटी येथे दैनंदिन उपासना, श्रीधर स्वामीच्या पादुकांना अभिषेक दासबोध पारायण आदी कार्यक्रम करण्यात आले, भक्तनिवास येथे सुरू असलेल्या श्री समर्थ दासबोध ग्रंथ पारायणाची सांगता झाली. विद्याधर बुवा वैशंपायन व रसिका ताम्हणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे पारायण गेले नऊ दिवस सुरू होते. त्यानंतर मंडळाचे अध्यक्ष हभप गुरुनाथमहाराज कोटणीस यांनी दासनवमी या विषयावर सुश्राव्य प्रवचन केले. श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने माऊली ब्लड बैंक सातारा यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाच्या या उपक्रमाला समर्थ भक्तानी मोठा प्रतिसाद दिला.

Sangali News : आश्वासन नको वीज पाहिजेत; जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन

दर अर्ध्या तासाला सातारा येथून गाड्या
मंदिर परिसरात अनिरुद्ध बापू आणि डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने स्वयंसेवक भाविकांच्या रांगांसाठी तैनात करण्यात आले होते. सज्जनगडावर येण्यासाठी सातारा एसटी आगारातर्फे विशेष यात्रा स्पेशल गाड्या दर अर्ध्या तासाला सातारा येथून सोडण्यात आल्या होत्या. गुरुवारी या महोत्सवाची सांगता लळिताच्या कीर्तनाने झाल्याची माहिती समर्थ रामदास स्वामी संस्थानचे विश्वस्त श्री स्वामी, समर्थ सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष योगेशबुवा रामदासी यांनी दिली. महोत्सवाची सांगता झाली तरी महाशिवरात्रीपर्यंत परिसरातील अनेक गावातील ग्रामस्थ दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात. दरम्यान, श्री समर्थ सेवा मंडळातर्फे सातारा शहरातील समर्थ सदन, सांस्कृतिक केंद्र येथे सुरू असलेल्या ग्रंथराज दासबोध पारायणाची बुधवारी सांगता करण्यात आली. या ठिकाणी असणाऱ्या श्री समर्थांच्या मूर्तीला विशेष अभिषेक व पूजा करून सुशोभित करण्यात आले होते.

Satara News : आव्हाने पेलणारे शिक्षण द्यायला पाहिजे; वारणा महाविद्यालयातील राष्ट्रीय परिषदेत तज्ज्ञांची मागणी

 

Web Title: Satara newsdas navami celebrated with enthusiasm at sajjangad ramnama chanted for 9 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 07:07 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • Satara News

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण
2

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
3

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
4

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.