या परिसंवादामुळे विद्यार्थ्यांना लेखन प्रक्रियेची स्पष्ट दिशा मिळाली. यावेळी आयोजित काव्यसंमेलनात रवी बावडेकर, संध्या पाटील व कांचन थोरात यांनी आपल्या कविता सादर केल्या. गझल, सामाजिक समस्या, शेतीविषयक प्रश्न, स्त्रीजीवनावर आधारित विडंबनात्मक व विनोदी आशय अशा विविध विषयांवरील कवितांनी रसिकांची दाद मिळवली. या सादरीकरणातून प्रेरणा घेत आदर्श ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीही आपल्या स्वरचित कवितांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
विद्यार्थ्यांना – केले मार्गदर्शन
संमेलनाचे अध्यक्ष अभयकुमार देशमुख यांनी, कथा-कादंबरी लेखनातून मिळणारा आत्मिक आनंद, तसेच लेखन हे भविष्यात आर्थिक उत्पन्नाचे साधन कसे ठरू शकते, याबाबत – विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. डी. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अनिल थोरात व एस. डी. खंडागळे यांनी केले. आभार यु.डी. जाधव यांनी मानले.
विकास, संवर्धन आणि वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज
संमेलनाचे स्वागताध्यक्ष अशोकराव थोरात यांनी इयत्ता अकरावी-बारावी या वयोगटात विद्यार्थ्यांना लेखनाचे संस्कार मिळाले, तर भविष्यात सक्षम लेखक घडू शकतात. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने तिचा विकास, संवर्धन आणि वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी अशा उपक्रमाची नितांत गरज आहे, असे मत व्यक्त केले.
Ans: कराड (प्र.) येथील श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आदर्श ज्युनिअर कॉलेज, मलकापूर येथे एकदिवसीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
Ans: विद्यार्थ्यांमध्ये लेखन, वाचन आणि सर्जनशीलतेला चालना देणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश होता.
Ans: अभयकुमार देशमुख, दादाराम साळुंखे, अरुण काकडे, संतोष लावंड आणि गौरी परचुरे यांनी परिसंवादात सहभाग घेतला.






