Buldhana: आश्वासनांचा पाऊस, पण पाण्याचा ठणठणाट! देऊळघाटमध्ये पाण्यासाठी महिलांचा एल्गार; प्रशासनाला धरलं धारेवर

Buldhana Deulghat Water Crisis: देऊळघाटमध्ये दुष्काळामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना ५० ते ६० रुपये प्रति बॅरल पाणी विकत घ्यावे लागत आहे. पाण्याच्या मागणीसाठी महिलांनी ग्रामपंचायतीवर धडक दिली, मात्र प्रशासक आणि ग्रामसेवक अनुपस्थित होते.

Buldhana Deulghat Water Crisis:
Buldhana Deulghat Water Crisis:photo- yandex
Published on: 
Updated on: 
  • देऊळघाटमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रमक पवित्रा

  • २५ हजार लोकसंख्या, नळ कोरडे, हंडे रिकामे

  • ग्रामपंचायत कार्यालयात महिलांची धडक

बुलडाणा: तालुक्यातील देऊळघाट गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. विकत घेऊनही पाणी मिळणे कठीण झाल्याने संतप्त संविधानदिनी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देत महिलांनी पाण्याची मागणी केली.देऊळघाट गावाची लोकसंख्या सुमारे २५ हजारांपेक्षा अधिक आहे.

एवढ्या मोठ्या लोकवस्तीला आजही शुद्ध व नियमित पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने ५० ते ६० रुपये प्रति बॅरल दराने पाणी विकत घ्यावे लागत आहे. सध्या दुष्काळाची तीव्रता वाढत असताना विकत घेऊनही सर्वांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे. गावासाठी विविध नळ योजनांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात येत असले तरी, अद्याप एकही योजना पूर्णत्वास गेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


Buldhana Deulghat Water Crisis:
Buldhana: मंजुरी मिळाली, पण खात्यात पैसेच नाहीत; बुलढाण्यात ५,१३७ शेतकरी मदतीपासून वंचित, अग्रिम अनुदानाच्या वाटपात तांत्रिक अडथळे

परिणामी दरवर्षी पाणीटंचाईचा प्रश्न कायम राहतो आणि नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी महिला ग्रामपंचायत कार्यालयात धडकल्या. मात्र, यावेळी प्रशासक तसेच ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित नसल्याने महिलांचा संताप आणखी वाढला.

ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण

गावातील पाणीप्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी करत महिलांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, ग्राम पंचायतीकडून वेळोवेळी पद्मावती धरणातून देऊळघाटला पिण्याचे पाणी आणण्याचे आश्वासन दिले जाते. प्रत्यक्षात अद्याप या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

शेतकऱ्यांना पाणीटंचाईनंतर चाऱ्याच्या खरेदीवर खर्च होण्याची शक्यता

बुलडाणा जिल्ह्यात यंदा दुष्काळामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन झाले नाही. परिणामी, जनावरांसाठी वर्षभर साठवून ठेवला जाणारा कडबा, कुटार आणि इतर चारा उपलब्ध होण्याचे प्रमाणही घटले आहे. एकीकडे दुधाळ जनावरांच्या संगोपनाचा खर्च वाढत असताना दुसरीकडे चारा खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. दूध विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा आता चाऱ्याच्या खरेदीवर खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय करणारे छोटे पशुपालकही आर्थिक अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.


Buldhana Deulghat Water Crisis:
Buldhana: दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ६ महिन्यांचे वेतन देणार! केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव यांची मोठी घोषणा