Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बल्क कन्झ्युमर’ मुळे मासेमाऱ्यांच्या डोक्याला ताप ? नेमकं ही संकल्पना आहे तरी काय ?

मच्छीमार सोसायट्यांना डिझेल खरेदीसाठी 'बल्क कन्झ्युमर' श्रेणीत ठेवल्यामुळे त्यांना वाढीव दराने डिझेल खरेदी करावे लागत आहे. या जाचक अटीतून मच्छीमार संस्थांची मुक्तता करून त्यांना तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 28, 2026 | 03:57 PM
‘बल्क कन्झ्युमर’ मुळे मासेमाऱ्यांच्या डोक्याला ताप ? नेमकं ही संकल्पना आहे तरी काय ?
Follow Us
Follow Us:
  • ‘बल्क कन्झ्युमर’ मुळे मासेमाऱ्यांच्या डोक्याला ताप ?
  • नेमकी ही संकल्पना आहे तरी काय ?
महाराष्ट्रातील मच्छीमार सोसायट्यांना डिझेल खरेदीसाठी ‘बल्क कन्झ्युमर’ श्रेणीत ठेवल्यामुळे त्यांना वाढीव दराने डिझेल खरेदी करावे लागत आहे. या जाचक अटीतून मच्छीमार संस्थांची मुक्तता करून त्यांना तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी पालघरचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी आज लोकसभेत केली.लोकसभेत डॉ. सवरा यांनी महाराष्ट्रातील मच्छीमार आणि त्यांच्या सहकारी संस्थांना भेडसावणाऱ्या या गंभीर आर्थिक समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

डिझेलच्या दरातील प्रचंड तफावत:
डॉ. सवरा यांनी निदर्शनास आणून दिले की, मच्छीमार सोसायट्यांना ‘बल्क कन्झ्युमर’ श्रेणीत टाकल्यामुळे त्यांना सुमारे 113 रुपये प्रति लिटर दराने डिझेल घ्यावे लागत आहे. तर दुसरीकडे, बाजारात डिझेलचा किरकोळ (रिटेल) दर अंदाजे 87रुपये प्रति लिटर आहे. दरातील या प्रचंड फरकामुळे लहान आणि पारंपारिक मच्छीमारांच्या उदरनिर्वाहावर अत्यंत प्रतिकूल परिणाम होत आहे.

Iran Israel War चा मासेमारी व्यवसायाला मोठा फटका; इंधन दरवाढ झाल्याने…

मच्छीमारांना औद्योगिक ग्राहकांप्रमाणे वागवणे अन्यायकारक
मच्छीमार हे राज्य सरकारच्या निर्धारित डिझेल कोटा प्रणालीअंतर्गत सहकारी संस्थांच्या माध्यमातून डिझेल मिळवतात. IOCL, HPCL, BPCL आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांसारख्या तेल कंपन्या त्यांना डिझेलचा पुरवठा करतात. मात्र, या सहकारी संस्थांना मोठ्या औद्योगिक ग्राहकांप्रमाणे ‘बल्क कन्झ्युमर’ मानणे योग्य नाही. या संस्था आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि सामान्य मच्छीमारांचे प्रतिनिधित्व करतात, याकडे डॉ. सवरा यांनी लक्ष वेधले.

‘बल्क कन्झ्युमर’ म्हणजे नेमकं काय ?
‘बल्क कन्झ्युमर’ ही संकल्पना मुळात मोठ्या प्रमाणावर वीज, पाणी किंवा इंधन वापरणाऱ्या उद्योग, कंपन्या किंवा व्यावसायिक घटकांसाठी वापरली जाते. . ‘म्हणजे असा ग्राहक जो एखादं साधन किंवा सेवा मोठ्या प्रमाणात म्हणजे (bulk मध्ये) वापरतो.ज्यांचा वापर सामान्य घरगुती ग्राहकांपेक्षा खूप जास्त असतो, त्यांना ‘बल्क कन्झ्युमर’ म्हणतात. आता ही संकल्पना सध्या मासेमारी करणाऱ्यांना जाचक का ठरत आहे ते जाणून घेऊयात. आखाती देशातील तणावामुळे इंधनावर याचा मोठा परिणाम होत आहे.

वसई-विरार महापालिकेचा ३८५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाची दुर्दशा! सांडपाणी खाडीत; प्रशासनाने आकारला दंड

मच्छीमारांसाठी ‘बल्क कन्झ्युमर’ जाचक का ठरते?

1. जास्त दर
बल्क कन्झ्युमर म्हणून वर्गीकरण झाल्यावर वीज किंवा इंधनाचे दर जास्त आकारले जातात. मच्छीमार आधीच कमी उत्पन्नात काम करतात, त्यामुळे हा अतिरिक्त खर्च त्यांच्यासाठी मोठा आर्थिक भार ठरतो.

2. पारंपरिक व्यवसायाला धक्का
मच्छीमारी हा पारंपरिक आणि लघुउद्योग स्वरूपाचा व्यवसाय आहे. त्याला उद्योगासारखे मानून नियम लावल्याने त्यांच्या कामावर अनावश्यक बंधने येतात.

3. सबसिडी आणि सवलतींचा अभाव
साधारणपणे लहान व्यावसायिक किंवा शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सवलती मच्छीमारांना मिळत नाहीत, कारण त्यांना ‘मोठा ग्राहक’ मानलं जातं.

 

Web Title: Bulk consumer causing headaches for fishermen what exactly is this concept

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 03:57 PM

Topics:  

  • fishing boat
  • Maharshtra news
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.