Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

EVM मशीन ठेवलेल्या स्ट्रॉग रूमचे डिस्प्ले चार मिनिटांसाठी बंद; जळगावमध्ये धक्कादायक प्रकार

जळगावमधील मतदानानंतर ठेवण्यात आलेल्या EVM मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉग रुमचे डिस्प्ले चार मिनिटांसाठी बंद झाले होते.

  • By प्रीति माने
Updated On: May 26, 2024 | 01:13 PM
EVM मशीन ठेवलेल्या स्ट्रॉग रूमचे डिस्प्ले चार मिनिटांसाठी बंद;  जळगावमध्ये धक्कादायक प्रकार
Follow Us
Close
Follow Us:

जळगाव : लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. सहा टप्प्यातील मतदान पार पडले असून राज्यातील सर्वच मतदारसंघातील मतदान देखील झाले आहे. यंदाची लोकसभा निवडणूक सर्व पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सर्वांचे भविष्य EVM मशीनमध्ये बंदिस्त झाले असले तरी उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. जळगावमधील मतदानानंतर ठेवण्यात आलेल्या EVM मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉग रुमचे डिस्प्ले चार मिनिटांसाठी बंद झाले. यानंतर उमेदवारांना धडकी भरली असून या माहितीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दुजोरा दिला आहे.

अनेक मतदारासंघातील स्ट्रॉग रुमच्या कॅमेऱ्याच्या तक्रारी यावर्षी समोर आलेल्या आहेत. बारामती, शिरुरसह अनेक ठिकाणी EVM मशीन ठेवलेल्या स्ट्रॉग रुममधील कॅमेरे बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत. अहमदनदरचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी तर थेट व्हिडिओ देखील शेअर केला. यानंतर आता जळगावमध्ये हाच प्रकार घडला आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव लोकसभेसाठी 13 मे रोजी मतदान झाले होते. या मतदानानंतर दोन्ही लोकसभा मतदार संघातील ईव्हीएम स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले आहे. त्या ठिकाणी 24 तास सुरक्षा दलाचा पहारा आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर क्षणक्षणाला आहे. परंतु रविवारी 26 मे रोजी सकाळी 9 वाजेपासून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले बंद झाला. हा डिस्प्ले सकाळी 9.04 मिनिटांपर्यंत म्हणेज चार मिनिटे बंद होते. त्यामुळे खळबळ उडाली. ही माहिती महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांनी त्वरित जिल्हाधिकारींना कळवली.

का बंद झाला डिस्प्ले?

जळगावमधील ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले चार मिनिटांसाठी बंद झाले. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे जनरेटरवरून इन्व्हर्टरवर वीज पुरवठा स्थलांतरित करताना सीसीटीव्ही कॅमेराचा डिस्प्ले बंद झाला होता, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्टीकरण दिले. डिस्प्ले बंद झाले असले तरी सर्व 36 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आपल्याकडे उपलब्ध आहे. तसेच त्याचे व्हिडिओ शूटिंग उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

Web Title: Camera off in evm strong room of jalgaon lok sabha election political news nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2024 | 01:13 PM

Topics:  

  • Lok Sabha Election 2024
  • political news

संबंधित बातम्या

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार
1

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

गुहागरात भाजपाला पुन्हा नवसंजीवनी; भास्कर जाधव यांना शह, माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे योग्य नियोजन
2

गुहागरात भाजपाला पुन्हा नवसंजीवनी; भास्कर जाधव यांना शह, माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे योग्य नियोजन

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री थोडक्यात बचावले..! हेलिकॉप्टर हवेत झाले असंतुलित अन्…, VIDEO आला समोर
3

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री थोडक्यात बचावले..! हेलिकॉप्टर हवेत झाले असंतुलित अन्…, VIDEO आला समोर

Maharashtra Politics : टिपू सुलतान प्रकरणी ‘आ बैल मुझे मार’अशी अवस्था; वातावरण बिघडताच संजय राऊत स्पष्टच बोलले
4

Maharashtra Politics : टिपू सुलतान प्रकरणी ‘आ बैल मुझे मार’अशी अवस्था; वातावरण बिघडताच संजय राऊत स्पष्टच बोलले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.