शहादा तालुक्यातून 21 लाखांचा गांजा जप्त
नंदुरबार : धुळे, नंदुरबार जिल्ह्यात गांजा जप्तीच्या कारवाया सातत्याने होत आहेत. शेतात पिकांमध्ये छुप्या पद्धतीने ही लागवड करण्यात येत असते. अशाचप्रकारे शहादा तालुक्यातील लंगडी भवानी येथे पिकांमध्ये लागवड करण्यात आलेला तब्बल 21 लाखांचा गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिसांनी केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहादा पोलिसांकडून करण्यात आलेली ही कारवाई मोठी मानली जात आहे. दरम्यान, नंदुरबारमध्ये मंगळवारीच गांजाची विक्री करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली होती. या कारवाईत साधारण एक लाख रुपये किमतीच्यावर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. यानंतर नंदुरबार जिल्ह्यातच दुसऱ्या दिवशी बुधवारी ही कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली.
दरम्यान, पोलिसांनी गांजाचा मोठा साठा जप्त केला असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ही मोठी कारवाई मानली जात आहे.
मुद्देमाल केला जप्त
शहादा तालुक्यातील लंगडी भवानी येथील शेतशिवारात शेतामध्ये गांजाची लागवड करण्यात आली होती. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे शहादा पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. शेतात लागवड करण्यात आलेला साधारण 21 लाख किमतींचा हा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.