Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! ओयो हॉटेल्स ठरताहेत देहव्यापाराचे अड्डे; सर्रासपणे तरुण-तरुणी येतात अन्…

काही ओयो हॉटेल्स अमली पदार्थांचे सेवन, हुक्का पार्ट्या आणि गुन्हेगारांच्या लपण्यासाठीची ठिकाणे बनले. पोलिसांपासून वाचण्यासाठी काही तडीपार आरोपीही ओयोचा वापर करतात. असेच एक प्रकरण वाठोडा हद्दीत उघडकीस आले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 24, 2026 | 02:00 PM
ओयो हॉटेल्स ठरताहेत देहव्यापाराचे अड्डे

ओयो हॉटेल्स ठरताहेत देहव्यापाराचे अड्डे

Follow Us
Follow Us:

नागपूर : शहरभर पसरलेले ओयो हॉटेल्स देहव्यवसायाचा अड्डा बनले आहेत. ओयो संचालक सरकारच्या ‘लॉजिंग-बोर्डिंग’ नियमांची ऐसीतैसी करून मोठ्या दिमाखात हा अवैध धंदा करत आहेत. महाविद्यालयीन तरुण-तरुणींसाठीही हे हॉटेल्स ‘मौज-मजा’ करण्याचा अड्डा बनले आहेत. याच महिन्याच्या सुरुवातीला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथक (एसएसबी) ने एमआयडीसी पोलिस ठाण्यांतर्गत वानाडोंगरी परिसरातील एमएच ४० नावाच्या ओयो हॉटेलमध्ये धाड टाकून देहव्यापाराचा भंडाफोड केला होता.

२ महिला पंजाबमधील लुधियानाच्या तर एक महिला उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील असल्याचे समोर आले होते. त्यापूर्वी एसएसबीकडूनच हुडकेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत बेसा मार्गावरील ओयो ग्रीन गेस्ट हाऊसवर धाड टाकली होती. ओयो हॉटेलच्या आड एक गुन्हेगार मुलासोबत मिळून तेथे कुंटणखाना चालवत होता. पोलिसांनी २ पीडित महिलांची सुटका करून आरोपी बाप-लेकाला अटक केली होती. असे एक ना अनेक उदाहरणे आतापर्यंत पुढे आली आहेत.

नागरिकांच्या मते, काही ओयो हॉटेल्स अमली पदार्थांचे सेवन, हुक्का पार्ट्या आणि गुन्हेगारांच्या लपण्यासाठीची ठिकाणे बनले. पोलिसांपासून वाचण्यासाठी काही तडीपार आरोपीही ओयोचा वापर करतात. असेच एक प्रकरण वाठोडा हद्दीत उघडकीस आले होते. गुन्हे शाखेचे वाहन चोरीविरोधी पथक वाठोडा ठाण्यांतर्गत लॉज व आस्थापनांची झडती घेत होते. यादरम्यान एका ओयो हॉटेलमध्ये शहरातील चर्चित वाहनचोर रिषभ असोपा प्रेयसीसोबत लपून राहात असल्याचे उघड झाले होते. त्यामुळे शहराची सामाजिक सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी निवासी भागांतील सर्व ओयो व इतर हॉटेल्सची यादी तयार करून वैधता तपासावी. तसेच नियमभंग करणाऱ्या संचालक, व्यवस्थापक व इमारत मालकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे.

प्रेमीयुगुलांची हॉटेल्सवर वर्दळ

निवासी भागातील अनेक ओयो हॉटेल्समध्ये सकाळपासूनच प्रेमीयुगुलांची (?) वर्दळ दिसून येते. महाविद्यालयीन तरुण-तरुणी कॉलेज व शिकवणी वर्गांना दांडी मारून येथे येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिणामी, परिसरातील रहिवाशांना अस्वस्थता, वादविवाद आणि सामाजिक तणावाला सामोरे जावे लागत आहे. अनेकांनी पोलिसांकडे व प्रशासनाकडे तक्रारी केल्या तरी ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप आहे.

नियमांची पायमल्ली?

सरकारच्या ‘लॉजिंग बोर्डिंग’ नियमांतर्गत केवळ व्यावसायिक भागातच हॉटेल उघडले जाऊ शकतात. हॉटेल उघडण्यापूर्वी ले-आऊटमध्ये तो भूखंड व्यावसायिक उपयोगासाठी असणे आवश्यक आहे. सातबाऱ्यावर हॉटेल मालकाचे नाव असले पाहिजे. हॉटेल इमारत बांधकाम (व्यावसायिक वापर) चा नकाशा महानगरपालिका किंवा एनएएसयूकडून मंजूर असला पाहिजे, यात ‘लॉजिंग-बोर्डिंग’ नियमांचा उल्लेख असला पाहिजे.

शासनाच्या अटी-शर्थींचे होत आहे उल्लंघन

वाहन पार्किंगसाठी व्यवस्था असली पाहिजे. हॉटेल बांधण्यापूर्वी अग्निशमन यंत्रणा महापालिकेकडून मंजूर असली पाहिजे. एखाद्या निवासी भागात निवासी वापराचे व्यावसायिक रूपांतर करणेही आवश्यक आहे. पालिकेचा वीजपुरवठा आणि नळ कनेक्शन व्यावसायिक स्वरुपाचे असावे, असा नियम आहे. त्यामुळे हॉटेल मालकाला शासनाच्या संबंधित विभागांकडून सुमारे ना-हरकत, मान्यता प्रमाणपत्रे घ्यावी लागतात. परंतु, शहरात शासनाचे नियम व अटींचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा आरोप आहे.

हेदेखील वाचा : धक्कादायक ! गरजू महिला-तरुणींना पैशांचे आमिष दाखवायची अन् नको ते करून घ्यायची; पोलिसांनी धाड टाकताच…

Web Title: Oyo hotels are becoming havens for prostitution

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 01:59 PM

Topics:  

  • crime news
  • Nagpur News
  • Prostitution Case

संबंधित बातम्या

पुणे विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई; तब्बल अडीच कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त
1

पुणे विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई; तब्बल अडीच कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

‘त्या’ तरुणाच्या खुनाचा दोन तासात लावला छडा; काळेपडळ पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
2

‘त्या’ तरुणाच्या खुनाचा दोन तासात लावला छडा; काळेपडळ पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

संतापजनक! पोलिस ठाण्यात कॅन्सरग्रस्त रुग्णावर लैंगिक अत्यचार, हरियाणातील पोलिसांचे कुकर्म उघड
3

संतापजनक! पोलिस ठाण्यात कॅन्सरग्रस्त रुग्णावर लैंगिक अत्यचार, हरियाणातील पोलिसांचे कुकर्म उघड

औषध कंपनीच्या प्रयोगशाळेतच लागली आग; कॉम्प्युटर, एसीसह अनेक वस्तू जळून खाक
4

औषध कंपनीच्या प्रयोगशाळेतच लागली आग; कॉम्प्युटर, एसीसह अनेक वस्तू जळून खाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.