Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lawrence Bishnoi Gang Extortion: लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने खंडणीच्या घटनांमध्ये वाढ, पोलिसांचे लक्ष स्थानिक गुंडांवर

गेल्या काही वर्षांत मुंबईत बिल्डर्सपासून ते फेरीवाल्यांपर्यंत खंडणी मागण्याचे प्रमाण वाढले आहे. या महिन्यात झालेल्या तपासाअंती पोलिसांचे लक्ष आता बिश्नोई टोळीऐवजी स्थानिक गुंड आणि बेरोजगार तरुणांकडे वळले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 24, 2026 | 02:45 PM
Increase in extortion cases in the name of Lawrence Bishnoi, police focus on local gangsters

Increase in extortion cases in the name of Lawrence Bishnoi, police focus on local gangsters

Follow Us
Follow Us:
  • भीती निर्माण करण्यासाठी स्थानिक गुंडांकडून लॉरेन्स बिश्नोई सारख्या आंतरराष्ट्रीय गँगस्टर्सच्या नावाचा वापर
  • खंडणीच्या वाढत्या आकड्यांमागे ऑनलाइन माध्यमातून होणारे ‘सेक्सटॉर्शन’ हे एक मोठे कारण आहे
  • दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारामुळे बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण होते.
Lawrence Bishnoi Gang Extortion: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत खंडणीच्या (Extortion) घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने बिल्डर आणि व्यावसायिकांना धमक्या येत असल्याच्या चर्चा असतानाच, मुंबई पोलिसांच्या गुन्हेगारी अहवालाने या चिंतेत अधिक भर घातली आहे.

आकडेवारी काय सांगते?

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात खंडणीच्या तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. २०२४ मध्ये १९९ गुन्ह्यांची नोंद झाली होती, तर २०२५ मध्ये ही संख्या ३१४ वर पोहोचली आहे. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, शहरात बिल्डर्स आणि मोठ्या व्यावसायिकांपासून ते अगदी रस्त्यावरील विक्रेत्यांपर्यंत सर्वांनाच “हफ्ता” वसुलीसाठी टार्गेट केले जात आहे.

डॉ. गौरी पालवे आत्महत्येप्रकरणी अनंत गर्जेला जामीन मंजूर; सुनावणीदरम्यान महत्त्वाची माहिती समोर

बिश्नोई गँगचा प्रभाव की केवळ नावाचा वापर?

लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून खंडणी मागितल्याचे अनेक आरोप होत असले तरी, मुंबई पोलिसांनी यावर महत्त्वाची स्पष्टीकरणे दिली आहेत. शहरात नोंदवण्यात आलेल्या बहुतांश घटनांमध्ये स्थानिक गुंड सक्रिय असून, ते केवळ दहशत निर्माण करण्यासाठी मोठ्या गँगस्टर्सच्या नावाचा वापर करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. खंडणीच्या वाढत्या आकडेवारीमागे ‘सेक्सटॉर्शन’ (Sextortion) हे एक मोठे कारण आहे. ऑनलाइन माध्यमांतून फसवणूक करून खंडणी उकळण्याचे प्रमाण वेगाने वाढले आहे. (Mumbai Crime news)

बॉलिवूड चित्रपटसृष्टी आणि लॉरेन्स बिश्नोई टोळी यांच्यातील संघर्ष फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली असून, यामागे बिश्नोई गँगचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, मुंबई पोलिसांच्या तपासात आता एक वेगळाच आणि धक्कादायक खुलासा समोर येत आहे.

BMC Swikrut Nagarsevak: ‘स्वीकृत ‘ची निवड लांबणीवर? इच्छुकांची नाराजी टाळण्यासाठी राजकीय पक्षांचा सावध पवित्रा

बिश्नोईच्या नावाचा ‘फेक’ वापर?

गेल्या काही वर्षांत मुंबईत बिल्डर्सपासून ते फेरीवाल्यांपर्यंत खंडणी मागण्याचे प्रमाण वाढले आहे. या महिन्यात झालेल्या तपासाअंती पोलिसांचे लक्ष आता बिश्नोई टोळीऐवजी स्थानिक गुंड आणि बेरोजगार तरुणांकडे वळले आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा प्रचंड प्रभाव आणि दहशत वापरून काही स्थानिक टोळ्या खंडणी उकळण्याचा प्रयत्न करत आहेत. तातडीने पैसे मिळवण्यासाठी काही बेरोजगार तरुण बिश्नोई टोळीचे सदस्य असल्याचे भासवून व्यावसायिकांना धमकावत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘२०२४ मध्ये अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतरही हा ट्रेंड कायम राहिला. काही लोक टोळीच्या प्रभावाखाली सोशल मीडियाचा वापर करतात, तर काहीजण ते पैसे कमविण्याची संधी म्हणून पाहतात. गेल्या वर्षी खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असली, तरी यामध्ये मोठ्या गुन्हेगारी टोळ्यांचा सहभाग नसल्याचे समोर आले आहे. ही वाढ प्रामुख्याने ‘सेक्सटॉर्शन’ आणि स्थानिक गुंडांकडून बिल्डर्स व कंत्राटदारांकडे मागितल्या जाणाऱ्या ‘हफ्त्या’मुळे झाली आहे. विशेष म्हणजे, प्रस्थापित टोळ्यांकडून थेट येणाऱ्या खंडणी कॉल्सच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे.

 

बिश्नोई टोळीच्या नावाने ज्वेलर्सला धमकावणारा मास्टरमाइंड जेरबंद

विलेपार्ले येथील प्रसिद्ध ज्वेलर्स अजित जैन यांना लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने धमकावून २० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या मुख्य सूत्रधाराला अखेर अटक करण्यात आली आहे. इम्तियाज आलम अन्सारी (३०) असे या आरोपीचे नाव असून, तो झारखंडमधील धनबादचा रहिवासी आहे. विशेष म्हणजे, आरोपी हा शाळा सोडलेला (School Dropout) तरुण आहे.

आरोपी अन्सारी याने जैन यांना धमकावण्यासाठी चक्क ब्रिटनचे (UK) सिम कार्ड वापरून व्हॉट्सॲप मेसेज आणि किमान सहा कॉल केले होते. “आम्हाला तुमच्याकडून २० लाख रुपये रोख हवे आहेत. तुम्हाला गोळी हवी आहे की उत्तर?” असा धमकीचा मेसेज त्याने पाठवला होता. पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकीही त्याने दिली होती. या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी चार जणांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीनंतर या मास्टरमाइंडचा शोध लागला.

 

 

Web Title: Increase in extortion cases in the name of lawrence bishnoi police focus on local gangsters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • crime news
  • Lawrence bishnoi Gang
  • Mumbai News

संबंधित बातम्या

बनावट चावीने कार उघडली, ५० लाख लुटले; पोलिसांनी ८ तासांत चोरांना पकडले
1

बनावट चावीने कार उघडली, ५० लाख लुटले; पोलिसांनी ८ तासांत चोरांना पकडले

Mumbai News : मुंबईत ‘वंचित’ आक्रमक! हुतात्मा चौकात आंदोलन, पोलिसांकडून कार्यकर्ते ताब्यात
2

Mumbai News : मुंबईत ‘वंचित’ आक्रमक! हुतात्मा चौकात आंदोलन, पोलिसांकडून कार्यकर्ते ताब्यात

सीसीटीव्ही फुटेजने चोरांचा माग काढला! भद्रावती पोलिसांनी नागपुरातून दोघांना पकडले
3

सीसीटीव्ही फुटेजने चोरांचा माग काढला! भद्रावती पोलिसांनी नागपुरातून दोघांना पकडले

एसटी बँकेचे मुख्य कार्यालय म्हणजे गुंडागर्दीचा अड्डा; श्रीरंग बरगे यांचा आरोप
4

एसटी बँकेचे मुख्य कार्यालय म्हणजे गुंडागर्दीचा अड्डा; श्रीरंग बरगे यांचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.