Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: शेवगावात बांगलादेशच्या नागिरकांचे वास्तव्य, चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

बांगलादेशी नागिरकांचे भारतात अवैध्यपणे वास्तव्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच एक घटना अहिल्यानगरमधील शेवगावात होत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 18, 2025 | 09:27 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • शेवगावात बांगलादेशच्या नागिरकांचे वास्तव्य
  • बनावट कागपत्रांच्या आधारे बनवले पासपोर्ट
  • चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
बांगलादेशी नागरिकांनी बनावट नावे, पत्ते व कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात चार बांगलादेशी नागरिकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय, पुणे यांनी २१ नोव्हेंबर रोजी अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयास पत्र पाठवून चार संशयित बांगलादेशी नागरिकांनी चुकीच्या पध्दतीने भारतीय पासपोर्ट मिळविल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानुसार या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश अधीक्षक घार्गे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव विभाग यांना दिले होते. चौकशीदरम्यान शुओ कोनक मुस्तुडी, राजू सिद्धार्थ चौधरी, जेलो प्रियतोश चौधरी व प्रकाश सुनिल चौधरी या चारही संशयितांनी सन २०१८ मध्ये शेवगाव शहरात सुमारे तीन महिने वास्तव्य करून भारतीय नागरिक असल्याचे भासवण्यासाठी बनावट पत्ते व कागदपत्रे शासकीय कार्यालयात सादर केल्याचे निष्पन्न झाले.

ठाकरे बंधू एकत्र आल्याने कोणताही परिणाम होणार नाही! राधाकृष्ण विखे पाटील यांचे वक्तव्य

चौघांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल

शुओ कोनक मुस्तुडी, राजू सिध्दार्थ चौधरी, जेलो प्रियतोश चौधरी व प्रकाश सुनील चौधरी या चौघांनी भारतीय नागरिक असल्याचा बनाव करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात विविध कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपनीय विभागाचे पोलीस अंमलदार संतोष वाघ यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली आहे.

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी ‘न्यू इयर गिफ्ट’! ३१ डिसेंबरला दोन नवीन मेट्रो मार्ग होणार खुले

भारतीय नागरिकत्वाचा पुरावा नाही

चौकशीदरम्यान या चारही व्यक्तींकडे भारतीय नागरिकत्वाचा कोणताही वैध कागदोपत्री पुरावा अथवा साक्षीदार आढळून आला नाही. या प्रकरणाचा सविस्तर चौकशी अहवाल 2 डिसेंबर 2025 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव विभाग यांनी अधीक्षक घार्गे यांच्याकडे सादर केला. या अहवालाच्या आधारे संबंधित चार बांगलादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.

Web Title: Case of fraud registered against four bangladeshi nationals residing in shevgaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 09:27 PM

Topics:  

  • Bangladeshi Arrested

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.