ठाकरे बंधू एकत्र आल्याने कोणताही परिणाम होणार नाही! राधाकृष्ण विखे पाटील यांचे वक्तव्य
अहिल्यानगर शहरातील प्रोफेसर चौकात उभारण्यात आलेला छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या अभिवादन कार्यक्रमानंतर विखे पाटील माध्यमांशी बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, ज्येष्ठ नेते अभय आगरकर, भाजप शहराध्यक्ष अनिल मोहिते, संपत बारस्कर, निखिल वारे, अविनाश घुले, सागर वेग, विनायक देशमुख, स्मारक समितीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
Mumbai Metro: मुंबईकरांसाठी ‘न्यू इयर गिफ्ट’! ३१ डिसेंबरला दोन नवीन मेट्रो मार्ग होणार खुले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत युती होणार नाही, असे जाहीर केले होते. याबाबत विचारले असता विखे पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी फक्त पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीसोबत मैत्रीपूर्ण लढत होईल, असे सांगितले आहे. अहिल्यानगर महापालिकेत महायुती म्हणून निवडणूक लढवावी, अशी बहुतांश कार्यकर्त्यांची इच्छा आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अशीच युती होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईमध्ये ठाकरे बंधू एकत्र आल्याने महायुतीवर परिणाम होईल का? याबाबत विखे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, कोणी एकत्र आले म्हणून परिणाम होत नसतो.
जनतेचा विश्वास सरकारवर आणि केलेल्या कामावर आहे. त्यामुळे त्यांच्या एकत्र येण्याचा महायुतीवर परिणाम होणार नाही. पुण्यात शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र लढण्याची चर्चा आहे, याबाचत विखे पाटील म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित लढावे किवा नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु राज्यात महायुती म्हणून आम्ही एकत्र काम करतोय. अशा वेळी इतर घटकांसोबत जाणे योग्य नाही.
Karjat News : अखेर उपोषण 12 तासांनी सुटलं; टाटा जलविद्युत प्रकल्प विरोधातील आंदोलनकर्त्यांची माघार
छत्रपती संभाजी महाराज अभिवादन सोहळ्यास दुपारी चारच्या सुमारास शहरातील चार ढोल ताशा पथकांच्या मानवंदनेने झाली. यानंतर युवक युवतीनी तलवारबाजी, दांडपट्टा, भालाफेक, लाठीकाठी अशा मर्दानी खेळांच चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवला. प्रसिद्ध शाहीर चंद्रकांत माने व साथीदारांनी महाराष्ट्राचा शाहिरी बाणा या पोवाड्याच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज व शंभूराजे यांचा जाज्वल्य इतिहास अधोरेखित केला. पोवाडा सादरीकरणात अफजलखानाचा वधाचा जिवंत देखावा कलाकारांना सादर केला.






