वाशिम : देश आत्मनिर्भर बनावा यासाठी गेल्या ७ वर्षात अनेक योजना जाहीर केल्या. अशी माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वाशिम येथे दिली. राज्य शासनाचे पैसे येत नाहीत. राज्य शासन राजकारण जास्त विकास कमी करते, अशी टीका नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली. तीन पक्षाचं झाड जून महिन्याच्या आत कोसळणार असं वक्तव्यही राणे यांनी केलं आहे.
पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) यांनी देश आत्मनिर्भर बनाव याकरिता ३० योजना आणल्या. अंमलबाजावणी होतंय का हे पाहण्यासाठी वाशिम इथं आलो, असं राणे म्हणाले. जीडीपीचा ५० टक्के वाटा माझ्या खात्याचा आहे. सर्वांगीण विकासासाठी अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे. योजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे. अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई करणार आहे, असंही ते म्हणाले. वाशिम जिल्ह्यातील चांगले शिक्षण मिळावे. आरोग्य (Health) चांगले राहावे याकरिता मंत्री म्हणून मी कटिबद्ध आहे. मराठा आरक्षणाबद्दल हस्तक्षेप करण्याचा अधिकार सदावर्तेंना नाही. आपल्या प्रगतीपेक्षा नागरिकांच्या अपेक्षांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं मत राणे यांनी व्यक्त केलं आहे.
[read_also content=”गुंड अबू सालेमच्या सुटकेबाबत २०३० नंतर होणार विचार, गृह मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयात दिले उत्तर https://www.navarashtra.com/india/central-government-will-think-about-giving-freedom-to-abu-salem-in-2030-nrsr-270969.html”]
राज्य शासन विकासाला पैसे देत नाही. शिवसेनेला मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार मिळत नाही. आधी सामनामध्ये राज ठाकरे यांना हिंदुत्ववादीचा औवैसी म्हटलं. आता खोमेनी म्हटलं यावर नारायण राणे म्हणाले की, संजय राऊत यांचा पगार किती मला माहीत आहे. साध्या पत्रकाराला पगार किती आणि तो प्लॉट तरी घेऊ शकतो का. त्यांनी ब्लॅकमेल करून संपत्ती मिळवली आहे. संजय राऊतांची संपत्ती ईडीने जप्त केली. त्यांची बोलण्याची लायकी नाही. संजय राऊतांबद्दल प्रश्न विचारू नका. मी संजय राऊतला पत्रकार समजत नाही. मुंबईत आज भाजपचं पोलखोल रथाची तोडफोड झाली. त्यावर नारायण राणे म्हणाले की, हे असे बालीश काम फक्त शिवसेनाच करते. हे कितीही तोडफोड केली तरी आम्ही मुंबई महानगरपालिकेचा भ्रष्टाचार उघड करणारच, असंही ते म्हणाले.
बेकायदेशीर भोंगे काढले पाहिजे,असं मत नारायण राणे यांनी व्यक्त केलं. तीन पक्षाचं झाड जून महिन्याच्या आत कोसळणार असं भाकितही राणे यांनी केलं आहे. मी बेकायदेशीर काम केलं नाही. मुंबई मनपाने जी नोटीस पाठवली त्यावर नारायण राणे म्हणाले की, मी जो बंगला बांधला त्याची संपूर्ण ओसी घेऊन बांधलेला आहे. त्यात इल्लिगल काहीही नाही आणि शेवटी जर कारवाई केली तर माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मात्र सुडाच्या राजकारणाने माझ्यावर नोटिशी पाठवत आहेत. पावसाचा अंदाज हे हवामान खात्याकडून घेऊन त्याचा अंदाज राजकारणासोबत जोडलं जातं. मात्र लोकशाहीवर भरवसा आहे. तीन मिनिटांत कॅबिनेटची बैठक उरकवणारे असे कुठले मुख्यमंत्री असतात का, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. सेना-राष्ट्रवादी युतीवर नारायण राणे म्हणाले, जर युती झाली आणि शिवसेना नेतृत्व करत असेल तर वाटोळं झालं असं समजून घ्या, असं उत्तर नारायण राणे यांनी दिलं.