मुंबई : बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम या अभ्यासक्रमांसाठी आता सीईटी परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष 2024-2025 पासून बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे.
पुढील शैक्षणिक वर्षांपासून बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम हे अभ्यासक्रम एआयसीटीईने आपल्या कक्षेत घेतले आहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमांना सीईटी लागू करण्यात आली आहे. गुरुवार 21 पासून अर्ज नोंदणीला सुरुवात होणार असून, ही सीईटी परीक्षा प्रथमच महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. नोंदणी अर्ज करण्याची अंतिम मुदत 11 एप्रिल 2024 पर्यंत देण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्षे 2024-2025 करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येते. उमेदवार, पालक, संबंधित संस्था यांच्यासाठी सामाईक प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम व माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे अधिकृत संकेतस्थळ वर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.