Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM-USHA Scheme: पीएम-उषा योजनेचा ‘बूस्टर’! अनुसूचित जाती उपघटकासाठी १७ लाखांचा निधी वाटप

केंद्र सरकारच्या 'राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान' (RUSA) या योजनेचा पुढचा टप्पा म्हणजे 'पीएम-उषा' (PM-USHA - Pradhan Mantri Uchchatar Shiksha Abhiyan) ही योजना होय.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 04, 2026 | 05:16 PM
PM-USHA Scheme: पीएम-उषा योजनेचा ‘बूस्टर’! अनुसूचित जाती उपघटकासाठी १७ लाखांचा निधी वाटप
Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने ‘पीएम-उषा’ (PM-USHA) योजनेअंतर्गत १७ लाख ३६ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.
  • ४ मार्च २०२६ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, हा निधी ‘मदर सॅन्क्शन’ तत्त्वावर मंजूर झाला आहे.
  • ‘पीएम-उषा’ (प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान) ही केंद्र पुरस्कृत योजना असून ती ‘रुसा’ (RUSA) योजनेचा पुढचा टप्पा आहे.
PM-USHA Scheme:  महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांनी पीएम-उषा (प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान) या केंद्रपुरस्कृत योजनेअंतर्गत व्यवस्थापन, संनियंत्रण, मूल्यमापन आणि संशोधन (एमएमईआर) घटकासाठी अनुसूचित जाती उपघटकांतर्गत रु. १७ लाख ३६ हजार निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. हा निधी केंद्र शासनाचा शंभर टक्के हिस्सा असून तो राज्य प्रकल्प संचालक, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांना बीईएएमएस प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

यासंदर्भात शासन निर्णय दि. ४ मार्च रोजी निर्गमित करण्यात आला. भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाकडून प्राप्त ‘मदर सॅन्क्शन’नुसार हा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर रक्कम मागणी सर्वसाधारण शिक्षण, ०३-विद्यापीठ आणि उच्च शिक्षण, ७८९-अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना या लेखाशीर्षांखाली सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील मंजूर तरतुदीतून वितरित करण्यात येणार आहे. हा निधी एमएमईआर घटकांतर्गत कार्यक्रम खर्चासाठी वापरला जाणार आहे.

Satara News: ७/१२ उतारा ते आधार नोंदणी; धोम येथील महाशिबिरात अर्जांचा पाऊस

शासन निर्णयानुसार, निधीचा वापर केवळ केंद्र शासनाने मंजूर केलेल्या उद्देशासाठीच करणे बंधनकारक आहे. खरेदी आणि बांधकामासंदर्भातील प्रक्रिया विद्यापीठ लेखासंहितेनुसार सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता घेऊन पूर्ण करावी लागेल. तसेच उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या संबंधित शासन निर्णयांनुसार खरेदी प्रक्रिया राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

काय आहे पीएम-उषा योजना

केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान’ (RUSA) या योजनेचा पुढचा टप्पा म्हणजे ‘पीएम-उषा’ (PM-USHA – Pradhan Mantri Uchchatar Shiksha Abhiyan) ही योजना होय. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP 2020) अंमलबजावणीसाठी २०२३ मध्ये ही योजना सुरू करण्यात आली.

 

US Iran War : इराणला मोठा दणका! भारताच्या दारात विनाशकारी वॉरशिप ‘नेस्तनाबूत’; अमेरिकेने केला गेम?

काय आहेत या योजनेची वैशिष्ट्ये?

गुणवत्ता सुधारणे: राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारून त्यांना जागतिक मानकांनुसार सक्षम करणे.

प्रवेश आणि समता: दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), ओबीसी (OBC) व महिलांना शिक्षणात समान संधी देणे.

नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन कौन्सिल (NAAC): ज्या संस्थांकडे मानांकन नाही, त्यांना ‘नॅक’ (NAAC) मानांकन मिळवण्यासाठी आर्थिक आणि तांत्रिक मदत करणे.

रोजगारक्षमता: विद्यार्थ्यांना कौशल्य-आधारित शिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळवण्याची क्षमता वाढवणे.

 

Web Title: Pm usha scheme booster fund allocation of rs 17 lakhs for scheduled caste sub category

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 05:16 PM

Topics:  

  • Marathi News

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
2

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
3

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
4

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.