Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: ७/१२ उतारा ते आधार नोंदणी; धोम येथील महाशिबिरात अर्जांचा पाऊस

महाशिबिराच्या यशस्वी आयोजनामुळे सामान्य नागरिकांना शासकीय कामकाज सुलभपणे करता आले असून, प्रशासनाच्या लोकाभिमुख उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 04, 2026 | 04:36 PM
Satara News: ७/१२ उतारा ते आधार नोंदणी; धोम येथील महाशिबिरात अर्जांचा पाऊस
Follow Us
Follow Us:
  • वाई तहसील कार्यालयाचे धोममध्ये यशस्वी महाशिबिर
  • धोममधील विधी शिबिरास वाईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
  • धोम येथील महाशिबिरात अर्जांचा पाऊस, नागरिकांनी मानले प्रशासनाचे आभार
 Satara News:  ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय योजनांची माहिती मिळावी आणि विविध दाखले एकाच छताखाली उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने धोम येथे आयोजित करण्यात आलेल्या विधी सेवा महाशिबिरास नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या शिबिरामुळे परिसरातील ग्रामस्थांना प्रशासकीय कामांसाठी जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाण्याचा त्रास वाचला आहे.

जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, नॉन-क्रिमिलेयर आणि इतर आवश्यक प्रशासकीय कागदपत्रांसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज सादर केले. विविध शासकीय विभागांच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देणारे स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात आले होते. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि कृषी विभागाच्या योजनांसाठी अनेक लाभार्थ्यांनी नोंदणी केली. विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने नागरिकांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची आणि मोफत कायदेशीर सल्ल्याची माहिती देण्यात आली.

Rajya Sabha Election: भाजपचा हुकुमाचा इक्का…!उमेदवारी जाहीर होताच तावडेंची पहिली प्रतिक्रीया

संतोष पाटील जिल्हाधिकारी सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ योगेश खरमाटे उपविभागीय अधिकारी आणि सोनाली मेटकरी यांच्या उपस्थितीत महाशिबिराच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसिल कार्यालय वाई यांचेमार्फत डोमेसाईल दाखले – २५, डोंगरी दाखले – २५, तसेच उत्पन्न दाखले – २७ अर्ज प्राप्त झाले. यासोबतच कुणबी दाखले – १२, ७/१२ उताऱ्यांचे वाटप – ८३ इतक्या संख्येने करण्यात आले. तसेच शिधापत्रिकेमधील नाव कमी-जास्त करणे – २३, आधार कार्ड नोंदणी – १९, निराधार योजनेसाठी अर्ज – १३ इतक्या सेवा नागरिकांना देण्यात आल्या.

शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याऐवजी गावातच सर्व सोयी उपलब्ध झाल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. महसूल विभाग, पंचायत समिती आणि विधी सेवा प्राधिकरणाच्या समन्वयित प्रयत्नांमुळे हे शिबिर यशस्वी झाले. याशिवाय, विविध इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी तहसील कार्यालय, वाई यांच्या नावे एकूण १०० अर्ज दाखल करण्यात आले. या महाशिबिरामुळे नागरिकांना एका ठिकाणी अनेक सेवा उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.

India Foreign Policy: हिंद महासागराचा ‘बॉस’ भारतच! जाणून घ्या काय आहे मोदी सरकारचा नवा ‘न्यू इंडिया’ फॉरेन

महाशिबिराच्या यशस्वी आयोजनामुळे सामान्य नागरिकांना शासकीय कामकाज सुलभपणे करता आले असून, प्रशासनाच्या लोकाभिमुख उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे तहसीलदार सोनाली मेटकरी नायब तहसीलदार भाऊसाहेब जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली सदर  कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी श्रीकांत धनावडे मंडळ अधिकारी धोम, शितल वाघ ग्राम महसुल अधिकारी धोम आणि पश्चिम भागातील सामाजिक कार्यकर्ते यांनी कष्ट घेतले.

Web Title: 712 uttar to aadhaar registration applications poured in at the mass camp in dhom

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 04:36 PM

Topics:  

  • Caste Reservation
  • Marathi News
  • Satara News

संबंधित बातम्या

Bajrangi Marathi Movie: भव्य हनुमंताच्या साक्षीने उलगडणार एका माणसाची कहाणी; ‘बजरंगी’चं पोस्टर चर्चेत
1

Bajrangi Marathi Movie: भव्य हनुमंताच्या साक्षीने उलगडणार एका माणसाची कहाणी; ‘बजरंगी’चं पोस्टर चर्चेत

Satara DJ Dolby Crackdown: डॉल्बी जप्तीवरून खासदार विरुद्ध पालकमंत्री! साताऱ्यात डीजेच्या आवाजावरून राजकीय जुगलबंदी
2

Satara DJ Dolby Crackdown: डॉल्बी जप्तीवरून खासदार विरुद्ध पालकमंत्री! साताऱ्यात डीजेच्या आवाजावरून राजकीय जुगलबंदी

Raigad News: कर्जतमध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष; 424 बाप्पांना अनंत चतुर्दशीला भावपूर्ण निरोप
3

Raigad News: कर्जतमध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष; 424 बाप्पांना अनंत चतुर्दशीला भावपूर्ण निरोप

‘मी जनता दरबार नाही, तक्रारदार दरबार घेणार!’ प्रताप सरनाईक नगररचना विभागावर आक्रमक
4

‘मी जनता दरबार नाही, तक्रारदार दरबार घेणार!’ प्रताप सरनाईक नगररचना विभागावर आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.