मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदासह आमदारकीचा राजीनामा (Resign) दिला. बुधवारी रात्री साडेनऊ वाजता त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली. त्यानंतर रात्री साडेअकरा वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेऊन राजीनामा सुपूर्द केला. त्यावर अभिनेता प्रकाश राज यांनी भाष्य केले आहे.
सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) बुधवारी दिलेल्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सोशल मीडियावर सामान्य जनतेसह सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हा सत्तासंघर्ष सुरू असताना अनेक घडामोडींवर ट्वीटद्वारे अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनीदेखील ट्विटरवर एक पोस्ट लिहित उद्धव ठाकरेंचे कौतुक केले.
You did great dear sir @OfficeofUT … and I’m sure people of Maharashtra will stand by you for the way you handled the state.. the Chanakya s may eat laddoos today.. but your genuinity will linger longer .. more power to you.. #justasking — Prakash Raj (@prakashraaj) June 29, 2022
‘तुम्ही खूप छान काम केलेत सर! …आणि मला खात्री आहे की, तुम्ही ज्या पद्धतीने राज्य सांभाळले, त्यासाठी महाराष्ट्रातील जनता नेहमी तुमच्या पाठीशी उभी राहील. चाणक्य आज लाडू खात असतील; पण तुमचा सच्चेपणा अधिक काळ टिकून राहील… तुम्हाला आणखी बळ मिळो!’, असे त्यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये लिहिल आहे.