Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पवारांसाठी प्रियांका चतुर्वेदींचा पत्ता कट करण्याची संजय राऊतांची चाल; भाजपच्या नेत्याचा निशाणा

भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 20, 2026 | 04:19 PM
पवारांसाठी प्रियांका चतुर्वेदींचा पत्ता कट करण्याची संजय राऊतांची चाल; भाजपच्या नेत्याचा निशाणा

पवारांसाठी प्रियांका चतुर्वेदींचा पत्ता कट करण्याची संजय राऊतांची चाल; भाजपच्या नेत्याचा निशाणा

Follow Us
Follow Us:

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मराठीचा मुद्दा उपस्थित करून प्रियांका चतुर्वेदी यांचा राज्यसभा निवडणुकीत पत्ता कट करण्याची संजय राऊत यांची चाल आहे. राज्यसभेचे गणित मांडताना उबाठाला वजा करून शरद पवारांचा मार्ग सुकर करण्याची धडपड संजय राऊत करीत आहेत. उबाठाच्या कोट्यात एक जागा असताना आत्ता प्रियांका चतुर्वेदी राज्यसभेवर गेल्या तर टर्म संपल्यानंतर राऊतांचा पत्ता कट होणार हे माहित असल्याने राऊतांचा हा डाव असल्याचे नवनाथ बन यांनी सांगितले.

 

बन म्हणाले की, रोटेशनचा मुद्दा पुढे करत यावेळी राज्यसभेवर शिवसेनेचा खासदार असेल असे विधान आदित्य ठाकरे करत असले तरी राऊतांची तशी इच्छा अजिबात नाही. राज्यसभेच्या खासदारकीवरून आधी कधीही मराठी कार्ड न टाकणाऱ्या राऊतांनी अचानक यावेळी मराठी कार्ड खेळले आहे. प्रियांका ह्या अमराठी असल्याने राऊतांचा हा डाव असून यावेळी राज्यसभेवर उबाठाला संधीच मिळू नये हीच मनोमन इच्छा राऊतांची असल्याची टीका त्यांनी केली.

शिंदे- राज भेट आणि उद्धव, राऊतांचा जळफळाट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट झाली मात्र जळफळाट झाला तो राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा असा टोमणा बन यांनी मारला. महापालिका निवडणुकीमध्ये उद्धव यांनी राज यांचा केसाने गळा कापल्यानंतर राज यापुढे उबाठाची साथ देतील का हा प्रश्न आपण उपस्थित केला होता याची आठवण बन यांनी करून देत येणाऱ्या काळात नवे समीकरण समोर येईल असे त्यांनी म्हंटले आहे.

मतदारांचे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे शत्रू आहेत का मित्र आहेत यावर मतदारांनी शिक्कामोर्तब केले आहे असे बन म्हणाले. शिंदे हे वंदनीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचे काम करत आहेत. बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्यापासून वाचवण्याचे काम करत आहेत आणि महाराष्ट्राच्या हिताचे कार्य करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे खरे शत्रू बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देणारे उद्धव ठाकरे, राऊत आहेत असा हल्लाबोल बन यांनी केला. महाराष्ट्रातील निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर एसआयआरचे काम सुरू होत आहे. या निर्णयाचे बन यांनी स्वागत केले. बोगस बांगलादेशी घुसखोर यांची हकालपट्टी या एसआयआरच्या माध्यमातून होईल आणि मतदार यादीचे शुद्धीकरण होईल. मतदार यादी सुधारण्याचा आग्रह उच्चरवात करणाऱ्या उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी या अभियानाचे स्वागत करायला हवे असा टोला बन यांनी लगावला.

फक्त मराठी दुबार नावे उद्धव, राज यांच्या डोळ्यात खुपत होती असे म्हणत बन यांनी दोघांवर शरसंधान साधले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ड्रगमुक्त मुंबई करण्याचे भाजपा आणि महायुतीचे स्वप्न आहे ते लवकरच पूर्ण होईल असा विश्वास बन यांनी व्यक्त केला. यवतमाळमधील ड्रग तस्करी दुर्दैवी आहे. त्यावर गृह विभागाने योग्य कारवाई केली असल्याचे ते म्हणाले. तसेच महाराष्ट्रामध्ये दहशतवादी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत, त्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

हे सुद्धा वाचा : माळेगाव कारखान्याच्या संचालकपदी सुनेत्रा पवार; अध्यक्षपदाच्या निवडीवरही शिक्कामोर्तब होणार?

Web Title: A bjp leader has criticized uddhav thackerays shiv sena mp sanjay raut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 04:19 PM

Topics:  

  • BJP
  • MNS Raj Thackeray
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Navarashtra Impact: अखेर मराठीला स्थान…! मराठीला डावलल्याचा मुद्दा ‘नवराष्ट्र’ने उचलला; परिवहन सभापतींची निमंत्रण पत्रिका बदलली
1

Navarashtra Impact: अखेर मराठीला स्थान…! मराठीला डावलल्याचा मुद्दा ‘नवराष्ट्र’ने उचलला; परिवहन सभापतींची निमंत्रण पत्रिका बदलली

Marathi Language: परिवहन सभापतींच्या निमंत्रण पत्रिकेत मराठी हद्दपार; नावांमध्येही चुका, भाजप प्रोटोकॉलला बगल!
2

Marathi Language: परिवहन सभापतींच्या निमंत्रण पत्रिकेत मराठी हद्दपार; नावांमध्येही चुका, भाजप प्रोटोकॉलला बगल!

नितीन गडकरी खरंच राजकारण सोडणार? ‘त्या’ विधानावर आला मोठा खुलासा
3

नितीन गडकरी खरंच राजकारण सोडणार? ‘त्या’ विधानावर आला मोठा खुलासा

‘भाजपाकडून आता मतदार याद्यांतही चोरी करण्याचा प्रयत्न’, SIR कामावर हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
4

‘भाजपाकडून आता मतदार याद्यांतही चोरी करण्याचा प्रयत्न’, SIR कामावर हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.