मुंबई : ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांची अवस्था बिकट आहे. त्यांना योग्य मानधन द्यावे. तसेच २० वर्षांपेक्षा अधिक काळापासून दोन हजार ते तीन हजार मानधन आहे. ते परवडत नाही. ते वाढवून देण्यात यावे, अशी मागणी आमदार अभिजित वंजारी यांनी आज मान्सून अधिवेशनामध्ये केली.
राज्यात जवळपास २१ हजारपेक्षा ग्रंथालये आहेत. त्यामुळे त्यांची कर्मचारी संख्या आहे. त्यातही अ, ब, क, ड वर्ग आहेत त्यांना जे मानधन मिळते ते योग्य आहे का, असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला. प्रश्नाला विलास पोतनीस, सुनील शिंदे, निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर यांनी पाठिंबा दिला.
[read_also content=”शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात होणार वाढ, दीपक केसरकर घेणार निर्णय https://www.navarashtra.com/maharashtra/deepak-kesarkar-said-that-honorarium-will-be-given-to-education-servants-in-state-nrsr-317290.html”]
या प्रश्नाला उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले. फिरत्या वाचनालयांना परवानग्या देणार, असे पाटील यांनी सांगितलं. तसेच, ग्रंथालयांनीही दर्जा वाढावा म्हणून प्रयत्न करावा असे त्यांनी सांगितले. ६० टक्क्यांनी अनुदान वाढवण्याचा प्रयत्न असेल, असेही पाटील यांनी सांगितले.