Maharashtra Politics : शरद पवार एका दिवसात वाईट कसे झाले? चंद्रकांत पाटलांचा सवाल; संजय राऊतांवरही निशाणा

शरद पवार यांनी ५० ते ५२ वर्षे काँग्रेससाठी काम केले, मग एका दिवसात ते वाईट कसे झाले? असा सवाल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्याबाबतही भाष्य.
Maharashtra Politics फोटो सौजन्य सोशल मिडिया
Maharashtra Politics फोटो सौजन्य सोशल मिडियाMaharashtra Politics फोटो सौजन्य सोशल मिडिया
Published on: 
Updated on: 
  • तब्बल पन्नास-बावन्न वर्षे काँग्रेसचा झेंडा विविध ठिकाणी रोवण्याचे काम

  • संजय राऊत यांचे राजकारण शरद पवार यांच्याशिवाय चालत नव्हते

  • डिलिमिटेशन विधेयकावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले

Maharashtra Politics : शरद पवार यांनी तब्बल ५० ते ५२ वर्षे काँग्रेसचा झेंडा ठिकठिकाणी रोवण्यासाठी काम केले. मात्र, एका दिवसात ते वाईट कसे झाले? त्यांनी एका दिवसात काय दरोडा घातला? त्यांनी तर खऱ्याला खरं म्हटलं. मग आता काहींची अडचण का होत आहे? असा सवाल करत राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्याविषयीच्या बदललेल्या राजकीय भूमिकांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला.

तब्बल पन्नास-बावन्न वर्षे काँग्रेसचा झेंडा विविध ठिकाणी रोवण्याचे काम

डिलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, शरद पवार यांनी तब्बल पन्नास-बावन्न वर्षे काँग्रेसचा झेंडा विविध ठिकाणी रोवण्याचे काम केले. असे असताना एका दिवसात ते वाईट कसे झाले? त्यांनी तर खऱ्याला खरं म्हटलं आहे. मात्र, आता काहींची अडचण होणार आहे.

Maharashtra Politics फोटो सौजन्य सोशल मिडिया
वाशिममध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, जलसंधारण कामांना गती द्या; पाणीटंचाईवर पालकमंत्री दत्तात्रय भरणेंचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश

संजय राऊत यांचे राजकारण शरद पवार यांच्याशिवाय चालत नव्हते

संजय राऊत यांच्यावर भाष्य करताना पाटील म्हणाले, संजय राऊत यांचे राजकारण शरद पवार यांच्याशिवाय चालत नव्हते, असे म्हटले जाते. २०१९ मध्ये महाराष्ट्रात जे घडले, ते शरद पवार आणि संजय राऊत यांच्या माध्यमातून घडविण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, आता तेच संजय राऊत शरद पवार यांच्याविषयी बोलणार आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

डिलिमिटेशन विधेयकावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकाराला दिलेल्या प्रत्युत्तराचे पाटील यांनी कौतुक केले. संबंधित पत्रकाराचे नाव न घेता सुप्रिया सुळे यांनी, 'मी कोणाच्या बापाची मुलगी आहे, हे तुम्हाला माहिती आहे,' असे ठणकावून सांगितले. तसेच, 'अशा पत्रकाराला भीक घालत नाही,' अशी भूमिका मांडल्याचा उल्लेख पाटील यांनी केला.

सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांनाच लक्ष्य केले असल्याचा संदर्भ देत पाटील यांनी त्यांच्या या ठाम भूमिकेचे कौतुक केले. डिलिमिटेशन विधेयकावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना शरद पवार, संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्या संदर्भाने चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Maharashtra Politics फोटो सौजन्य सोशल मिडिया
Washim: सफाई कर्मचाऱ्यांना योजनांचा लाभ द्या; रवी राम कलोसे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश, राष्ट्रीय आयोगाकडून आढावा