Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्जमुक्तीचे १७५ कोटी ७८ लक्ष रुपये सीडीसीसी बँकेला प्राप्त; २३ हजार ५०८ शेतक-यांचा समावेश

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’ अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 23,508 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 175 कोटी 78 लाख 55 हजार 144 रुपये सीडीसीसी बँकेला प्राप्त झाले आहेत.

  • By विवेक
Updated On: Aug 08, 2026 | 10:06 PM
वर्ध्यात ३२ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ; पालकमंत्री पंकज भोयर यांची माहिती

वर्ध्यात ३२ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ; पालकमंत्री पंकज भोयर यांची माहिती

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’ अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 2 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार सुरू करण्यात आलेल्या या योजनेत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (सीडीसीसी) 36 हजार 757 पात्र शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाली होती.

यापैकी 23 हजार 508 शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी 175 कोटी 78 लाख 55 हजार 144 रुपये सीडीसीसी बँकेला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

पहिल्या टप्प्यात राज्यातील बँकांना हजारो कोटींचे वितरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पहिल्या टप्प्यात बँकांना निधी वितरित करण्यात आला. या प्रक्रियेत चंद्रपूर जिल्ह्यातील सीडीसीसी बँकेच्या 23 हजार 508 शेतकऱ्यांचाही समावेश आहे.

महाबळेश्वरमध्ये पावसाचा धुमाकूळ; वेण्णा तलाव ओव्हरफ्लो, आंबेनळी घाटात दरडी तर पर्यटकांची तुफान गर्दी

कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना खरीप हंगामातील शेतीची कामे करण्यासाठी पुन्हा आर्थिक अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी नव्याने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे कर्जाच्या ओझ्यातून मुक्त झालेल्या शेतकऱ्यांना आगामी शेती हंगामासाठी आर्थिक पाठबळ मिळण्याची अपेक्षा आहे.

आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक

योजनेची अंमलबजावणी करताना तांत्रिक अडचणी आणि दिरंगाई टाळण्यासाठी प्रक्रिया डिजिटल आणि पारदर्शक पद्धतीने राबवली जात आहे. शासनाने निश्चित केलेल्या मुदतीत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे.

शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे. यासाठी जवळच्या सहकारी संस्था, आपले सरकार सेवा केंद्र (CSC) किंवा संबंधित सेवा केंद्राशी संपर्क साधता येणार आहे.

Washim News: वाशिम जिल्ह्याच्या जलसाठ्यात वाढ; मध्यमप्रकल्पात २५.५६ टक्के जलसाठा

ऑनलाइन तक्रार न झाल्यास ऑफलाइन पर्याय

योजनेशी संबंधित तक्रार ऑनलाइन पद्धतीने नोंदवता येत नसल्यास शेतकऱ्यांना ऑफलाइन तक्रार दाखल करण्याचीही सुविधा आहे. संबंधित तालुक्याच्या सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करता येईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था जयसिंग ठाकूर यांनी दिली आहे.

त्यामुळे कर्जमाफीच्या लाभासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणीकरणाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Chandrapur farmers loan waiver 2026 23508 farmers 175 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 10:06 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Farmer Loan Waiver
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

राज्यात 30.82 लाखांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त; सणासुदीत भेसळखोरांवर FDA ची असणार नजर
1

राज्यात 30.82 लाखांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त; सणासुदीत भेसळखोरांवर FDA ची असणार नजर

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, बांधावर जा, पंचनामे करा’, एकनाथ शिंदेंनी दिल्या मंत्र्यांना सूचना
2

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, बांधावर जा, पंचनामे करा’, एकनाथ शिंदेंनी दिल्या मंत्र्यांना सूचना

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली उपसमिती तर मंत्र्यांना बांधावर जाण्याचे आदेश
3

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली उपसमिती तर मंत्र्यांना बांधावर जाण्याचे आदेश

राज्यातील तब्बल साडेपाच लाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत; सोशल मीडियावरील ‘ती’ यादी बनावट
4

राज्यातील तब्बल साडेपाच लाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत; सोशल मीडियावरील ‘ती’ यादी बनावट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.