गेली १९७ वर्षे शुध्दता, परंपरा आणि विश्वास या त्रिसुत्रीच्या भक्कम पायावर उभ्या राहिलेल्या व निरंतर प्रगती करत प्रत्येकग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण करणारे नांव म्हणजे चंदुकाका सराफ ज्वेलर्स! चंदुकाका सराफ ज्वेलर्सने शुध्द सोने ही संकल्पना घराघरात पोहचवली व यामुळेच संपुर्ण महाराष्ट्रभर कार्यभार संपादित केलेल्या चंदुकाका सराफ ज्वेलर्स यांनी सोन्याच्या व हिर्यांच्या दागिन्यांचे भव्य प्रदर्शन वाई परिसरातील ग्राहकांच्या सोयीकरीता उत्तमोत्तम आणि कलात्मक दागिन्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचा शुभारंभ वाई-खंडाळा विधानसभा मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील यांचे हस्ते व जिल्हा परिषद सदस्य महादेव मस्कर, वाईचे माजी नगराध्यक्ष अनिल सावंत, सुर्योदय संस्थेच्या अध्यक्षा रोहिणी दिक्षीत, नगरसेवक दिपक ओसवाल, उत्कर्ष पतसंस्थेच्या चेअरमन अनुराधा कोल्हापुरे, किसनवीर साखर कारखान्याचे संचालक दिलीप पिसाळ व चंदुकाका सराफ ज्वेलर्सचे क्लस्टर हेड रूपेश शर्मा, सातारा ब्रँच मॅनेजर रूपाली कदम अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सोने व हिर्यांच्या लक्षवेधी दागिन्यांचे भव्य प्रदर्शन व विक्री वाई येथे दि. ५ ते ८ जानेवारी २०२४ या कालावधीत साठे मंगल कार्यालय, किसनवीर चौक, गणपती आळी, वाई येथे स. 10 ते रा 8 या वेळेत सुरू रहाणार आहे. सदर प्रदर्शनाला वाईकरांनी पहिल्या दिवसापासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सोने व हिर्याचे नवनवीन डिझाईन्स्चे असंख्य दागिने वाईकरांना उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे वाईकरांनी आपले आवडते दागिने घेण्यासाठी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन चंदुकाका सराफ ज्वेलर्सचे संचालक सिध्दार्थ शहा यांच्यातर्फे करण्यात आले आहे.