Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : बांधकाम परवानगीच्या नियमावलीत बदल; पर्यटनाला चालना देण्यासाठी आता…

राज्य शासनाने हॉटेल, रिसॉर्ट आणि ॲम्युजमेंट पार्कसाठी बांधकाम नियमावलीमध्ये काही सवलती दिल्या आहेत. यामध्ये रस्ता रूंदीनुसार मान्य 'एफएसआय' व्यतिरिक्त पाचपर्यंत 'एफएसआय' वापरून बांधकामास करण्यास परवानगी मिळणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 18, 2025 | 10:49 AM
Pune News : बांधकाम परवानगीच्या नियमावलीत बदल; पर्यटनाला चालना देण्यासाठी आता...

Pune News : बांधकाम परवानगीच्या नियमावलीत बदल; पर्यटनाला चालना देण्यासाठी आता...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : शहरातील रस्त्याची रुंदी आणि इमारतीची उंची यासंदर्भातील बांधकाम परवानगीच्या नियमावलीत बदल केले आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहनपर नियमावलीत (यूडीपीसीआर) याचा समावेश केला गेला आहे.

राज्य सरकारकडून नुकतेच राज्य पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे. त्याचा समावेश एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहनपर नियमावलीत (यूडीपीसीआर) करण्यात आला आहे. त्यामध्ये पर्यटनाला चालना मिळावी, त्यातून रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी १२ मीटर रुंदीच्या रस्त्यावर तीन, अठरा मीटर रुंदीच्या रस्त्यावर साडेतीन, तर २७ मीटर रुंदीच्या रस्त्यावर चारपर्यंत ‘एफएसआय’ वापरून बांधकाम करण्यास परवानगी दिली आहे. राज्य शासनाने हॉटेल, रिसॉर्ट आणि ॲम्युजमेंट पार्कसाठी बांधकाम नियमावलीमध्ये काही सवलती दिल्या आहेत. यामध्ये रस्ता रूंदीनुसार मान्य ‘एफएसआय’ व्यतिरिक्त पाचपर्यंत ‘एफएसआय’ वापरून बांधकामास करण्यास परवानगी मिळणार आहे. या निर्णयामुळे पुणे शहरात उंचच उंच हॉटेल उभारता येणार आहे.

तसेच रेडी रेकनरमधील दराच्या साठ टक्के शुल्क आकारून एकूण ‘एफएसआय’च्या साठ टक्के ‘अॅंन्सलरी एफएसआय’ वापरण्यास ही परवानगी दिली आहे. याशिवाय बांधकाम विकसन शुल्क टप्याटप्प्याने भरण्याची सवलतही देण्यात आली आहे. यापूर्वी हॉटेल, रिसॉर्ट अथवा ॲम्युजमेन्ट पार्क उभारताना मान्य ‘एफएसआय’ व्यतिरिक्त जादा ‘एफएसआय’ वापरून बांधकाम करण्यास राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागत असे. या नियमांचा समावेश ‘यूडीसीपीआर’मध्ये केल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर त्यास मान्यता मिळणार आहे.

उंच इमारतींची वाढू लागली संख्या 

पुणे महापालिका हद्दीत उंच इमारतींची संख्या वाढू लागली आहे. संपलेल्या वर्षात (२०२४) मध्ये महापािलकेने गगनचुंबी अशा १६ इमारतीच्या प्रस्तावांना मान्यता दिली आहे. २०२३ मध्ये महापािलकेने असे नऊ प्रस्ताव मंजुर केले हाेते. तर २०१६ ते २०२३ या कालावधीत एकूण ४१ प्रस्ताव मंजुर केले आहेत. शहरात विशेषत: उपनगरांत माेठ्या प्रमाणावर गगनचुंबी इमारतींचे बांधकाम हाेऊ लागले आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, उच्च-उंच इमारतींसाठी परवानग्या कठोर तपासणीनंतर दिल्या जातात.

Web Title: Changes in building permit regulations in pune city nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2025 | 10:45 AM

Topics:  

  • Pune Municipal Corporation
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
1

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Election News: रस्ते नाहीत, पाणी नाही,  मतदान नाही;  वाघोलीतील नागरिकांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार 
2

Pune Election News: रस्ते नाहीत, पाणी नाही,  मतदान नाही;  वाघोलीतील नागरिकांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार 

Pune Ward structure: पुणे महापालिकेची अंतिम प्रभागरचना लवकरच जाहीर होणार;  १४ ते १५ बदलांची चर्चा
3

Pune Ward structure: पुणे महापालिकेची अंतिम प्रभागरचना लवकरच जाहीर होणार; १४ ते १५ बदलांची चर्चा

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक
4

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.