Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐन विधानसभा निवडणुकीआधी राज्यात ‘या’ तिसऱ्या आघाडीची घोषणा; महायुतीसह ,मविआची डोकेदुखी वाढणार?

राज्यात तिसऱ्या आघाडीची घोषणा झाल्याने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या तिसऱ्या आघाडीमुळे महायुती आणि महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटलांना आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 19, 2024 | 08:40 PM
ऐन विधानसभा निवडणुकीआधी राज्यात 'या' तिसऱ्या आघाडीची घोषणा; महायुतीसह ,'मविआ'ची डोकेदुखी वाढणार ?

ऐन विधानसभा निवडणुकीआधी राज्यात 'या' तिसऱ्या आघाडीची घोषणा; महायुतीसह ,'मविआ'ची डोकेदुखी वाढणार ?

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर: आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकारणामध्ये नवीन सक्षम पर्याय देण्याची घोषणा छत्रपती संभाजीराजे, राजू शेट्टी, बच्चू कडू, शंकरअण्णा धोंडगे, वामनराव चटप, नारायण अंकुशे यांनी एकत्रितपणे केली. व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ‘परिवर्तन महाशक्ती’ ची घोषणा करण्यात आली. २६ सप्टेंबरला परिवर्तन महाशक्तीचा मेळावा छत्रपती संभाजीनगरमध्ये हा मेळावा होणार आहे, अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली. तसेच महायुतीचे मधून बाहेर पडल्याचे ही त्यांनी सांगितले.

स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील जनता अस्वस्थ झालेली असून त्यांना सक्षम व सुसंस्कृत पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्यातील सध्याचे राजकारण पाहता, पुर्वी मोठ्या गावांना बुद्रुक व छोट्या गावांना खुर्द म्हटले जायचे तशीच शिवसेना व राष्ट्रवादीची अवस्था झालेली आहे. ज्योती मेटे यांच्यासोबत बोलणे झाले आहे. त्या सुद्धा सकारात्मक आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा झाली असून ते सुद्धा सोबत येतील. मनोज जरागे यांनी पण एकत्रित यावे यसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांची भेट झाली आहे, राजकीय चर्चाही झाली आहे. आपण एक उद्दिष्ट घेऊन आपण लढू, ते आम्ही एकत्रित आलो तर आम्ही सगळे निवडून आणू शकतो, असे त्यांनी नमूद केले.”

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले, ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा सातबारा कोणत्याही पक्षाच्या नावावर केलेला नाही, ‘परिवर्तन महाशक्ती’ चे नेतृत्व सामूहिक हे असणार आहे.” पुढे बोलताना प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू बोलताना म्हणाले, ‘‘आमच्या जवळ विचारांचा व मुद्द्यांचा अजेंडा आहे. ज्या पक्षांना व संघटनांना आमच्या परिवर्तन महाशक्ती मध्ये सहभागी होयचे असेल त्यांच्यासाठी आमचे दरवाजे उघडे असतील.

महाराष्ट्र राष्ट्र समितीचे शंकरअण्णा धोंडगे म्हणाले, ‘‘महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा लक्षात घेता, प्रस्थापित आघाड्यांना एक आश्वासक पर्याय देण्याचा निर्णय व निश्चय आजच्या बैठकीत झाला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अत्यंत चांगले काम करून दाखवतील असा विश्वास आहे.तसेच परिवर्तन महाशक्ती मध्ये विविध विषयांवर निर्णय घेण्यासाठी सुकाणू समिती स्थापन करण्यात येणार आहे. आजच्या पत्रकार परिषदेत स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव, अंकुश कदम, माधव देवसरकर यांच्यासह सर्व पक्षांचे प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Chatrapati sambhajiraje bacchu kadu and raju shetti announced parivartan mahashakti alliance for maharashtra assembly election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2024 | 08:39 PM

Topics:  

  • Bacchu Kadu
  • Maharashtra Assembly election 2024
  • Raju Shetti
  • Sambhajiraje Chhatrapati

संबंधित बातम्या

Bacchu Kadu News:माझ्या मतदारसंघात १३ हजार दुप्पट मते…; बच्चू कडूंचा निशाणा
1

Bacchu Kadu News:माझ्या मतदारसंघात १३ हजार दुप्पट मते…; बच्चू कडूंचा निशाणा

शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास…; शेतकरी हक्क परिषदेतून बच्चू कडू यांचा इशारा
2

शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास…; शेतकरी हक्क परिषदेतून बच्चू कडू यांचा इशारा

अखेर वादावर पडदा, माधुरी कोल्हापूरात परत येणार! राजू शेट्टींनी अंबानी परिवाराचे मानले आभार
3

अखेर वादावर पडदा, माधुरी कोल्हापूरात परत येणार! राजू शेट्टींनी अंबानी परिवाराचे मानले आभार

Kadu VS Bawankule : बच्चू कडू आंदोलनाच्या नावाखाली नौटंकी करतात…; चंद्रशेखर बावनकुळेंनी पुन्हा डिवचले
4

Kadu VS Bawankule : बच्चू कडू आंदोलनाच्या नावाखाली नौटंकी करतात…; चंद्रशेखर बावनकुळेंनी पुन्हा डिवचले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.