Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याने छगन भुजबळ नाराज? स्वतः भुजबळांनी दिले स्पष्टीकरण

राज्यसभेसाठी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात आली आहे. यावरुन छगन भुजबळ नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यावर भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 13, 2024 | 03:20 PM
सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याने छगन भुजबळ नाराज? स्वतः भुजबळांनी दिले स्पष्टीकरण
Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : राज्यसभेसाठी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात आली आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल देखील केला. अजित पवार गटाकडून पुन्हा एकदा सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात आल्यामुळे पक्षातील एक गट नाराज असल्याची चर्चा होती. या उमेदवारीमुळे छगन भुजबळ नाराज असल्याचे बोलले जात होते. यावर आता छगन भुजबळ यांनी स्वःत स्पष्टीकरण दिले आहे.

अजित पवार यांची चूक नाही

मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्यसभेबाबत मत व्यक्त केले. मंत्री भुजबळ म्हणाले, राष्ट्रवादी पक्षातील कोर कमिटीचे सदस्य आणि खासदार प्रफुल्ल पटेल व खासदार सुनील तटकरे यांच्यासह चर्चा करुन राज्यसभा उमेदवाराबाबत निर्णय घेण्यात आला. ही बैठक काल पार पडली आणि सर्वांच्या मते सुनेत्रा पवार यांचे उमेदवारीसाठी नाव ठरवण्यात आले. असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. तसेच अजित पवार हे घरातील लोकांना संधी देत आहे असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर छगन भुजबळ म्हणाले, यामध्ये अजित पवार यांची काय चूक आहे. निर्णय काय फक्त अजित पवार यांनी घेतलेला नाही. निर्णय सर्व कमिटीने बैठकीमध्ये घेतला आहे. त्यामध्ये अजित पवार यांना बोलण्यामध्ये काय अर्थ आहे?, असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होतेच असं नाही

छगन भुजबऴ .यांना ते नाराज आहेत का असा सवाल करण्यात आला. त्यावर त्यांनी माझ्या तोंडावरुन मी नाराज वाटत आहे का असा प्रतिसवाल केला. भुजबळ म्हणाले, राज्यसभेसाठी मी देखील इच्छुक होतो. माझ्याप्रमाणे आणखी 4 ते 5 जण इच्छुक होती. मात्र बैठकीमध्ये सर्व चर्चेअंती सुनेत्रा पवार यांचं नावं निश्चित करण्यात आलं. त्यामुळे मी नाराज वैगरे काही नाही. आणि ठीक आहे. पक्षामध्ये काम करत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन व चर्चा करुऩ निर्णय घ्यायचे असतात. 57 वर्षांपासून हेच करत आहोत. त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होतेच असं नाही, असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

Web Title: Chhagan bhujbal clarified on rumor about he was unhappy about sunetra pawar being nominated for the rajya sabha elections nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2024 | 03:20 PM

Topics:  

  • Chhagan Bhujbal
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Nashik Rainfall News: अतिवृष्टीने नाशिकमध्ये हाहा:कार; भुजबळ दौरा सोडून नाशिककडे रवाना
1

Nashik Rainfall News: अतिवृष्टीने नाशिकमध्ये हाहा:कार; भुजबळ दौरा सोडून नाशिककडे रवाना

‘आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही’; छगन भुजबळांची टीका
2

‘आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही’; छगन भुजबळांची टीका

Maharashtra Politics : धनंजय मुंडेंचे ‘ते’ विधान ऐकताच भुजबळांनी थेट…; नेमकं घडलं तरी काय?
3

Maharashtra Politics : धनंजय मुंडेंचे ‘ते’ विधान ऐकताच भुजबळांनी थेट…; नेमकं घडलं तरी काय?

छगन भुजबळांचा आनंद टिकला नाही फार; बेनामी व्यवहार प्रकरणी खटला सुरु
4

छगन भुजबळांचा आनंद टिकला नाही फार; बेनामी व्यवहार प्रकरणी खटला सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.