
AIMIM Imtiaz Jaleel car attacked in Chhatrapati Sambhaji Nagar Political News
विशेष बाब म्हणजे एआयएमआयएम पक्षाचाच नाराज नेत्यांनी हा हल्ला केला आहे. महापालिका निवडणुकीत जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आले. यामुळे एआयएमआयएम पक्षातील नेते नाराज होते. याच नाराज नेत्यांकडून इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हा हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय वर्तुळामध्ये एकच गोंधळ निर्माण झाला आहे. इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला करण्यापूर्वी त्यांना काळे झेंडे देखील दाखवण्यात आले. त्यानंतर त्यांच्या वाहनावर हल्ला झाला आहे. यानंतर कार्यकत्यांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे.
हे देखील वाचा : निवडणुकीच्या तोंडावर भाजपला दणका! प्रचार गीतातील एका शब्दाने निवडणूक आयोगाचा स्पष्ट नकार
एआयएमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्या गाडीवर नाराज कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला. यामुळे परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला. त्यामुळे या भागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.मात्र यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
हे देखील वाचा : भाजपसोबतची युती AIMIM ला सुद्धा नाही मान्य; इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली नाराजी
गाडीवर हल्ला झाल्यानंतर इम्तियाज जलील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘राजकारणात असे प्रकार होत असतात. मला त्यांच्या बाबतीत काही बोलायचं नाही. लोकशाहीने मला कुठही जाण्याचा आणि पदयात्रा करण्याचा अधिकार दिलेला आहे, मी ते करत आहे. आता कुणाला आम्ही इकडे येऊ नये याबाबत आक्षेप असेल, मात्र आमचा उमेदवार आहे त्यामुळे आम्ही प्रचार करत आहोत. आता 16 तारखेला जेव्हा निकाल येईल तेव्हा तुम्हाला कळेल की काळ्या झेंड्यांचा अर्थ काय आहे आणि हिरव्या झेंड्याचा अर्थ काय आहे.’अशा शब्दांत इम्तियाज जलील यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.