Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिहारमध्ये ओवेसींच्या पक्षासोबत घडणार तेच जुनं षड़यंत्र? यावेळी कोण करणार कोणाचा गेम?

बिहारमध्ये AIMIM पक्षात संभाव्य फुटीच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. काही आमदार जेडीयूमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर AIMIMकडून ठाम नकार देण्यात आला आहे. आमदारांनी पक्षात कोणतीही फूट नसल्याचं स्पष्ट केलं.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 19, 2026 | 05:48 PM
owaisi aimim

owaisi aimim

Follow Us
Close
Follow Us:
  • बिहारच्या राजकारणात AIMIM मध्ये फूट पडण्याच्या चर्चा
  • आमदारांचा नितीश कुमारांसोबत संपर्क? 
  • 2022 मध्ये बिहारचे राजकारण तापलं होतं
Owaisi AIMIM Bihar Politics : बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालं असून राजकीय वर्तुळात चर्चांना जोर आला आहे. असदुद्दीन ओवैसी यांच्या All India Majlis-e-Ittehadul Muslimeen (AIMIM) पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षातील काही आमदार फुटून Janata Dal (United) (जेडीयू) मध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. विविध पक्षांच्या नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांमुळे या चर्चांना आणखी उधाण आले आहे.

Mira Bhayander News : महासभेत करदरामध्ये फेरफार ; भाजपाला मिळाला घरचा आहेर

आमदार मुर्शिद आलम यांनी चर्चा फेटाळल्या

AIMIM पक्षातील फुटीबाबत चर्चांना उधाण आलं असताना  AIMIM पक्षाचे आमदार मुर्शिद आलम यांनी या सगळ्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. त्यांनी नितीश कुमार यांच्यासोबत कोणताही संपर्क नसल्याचं सांगितलं. पक्षप्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी अगोदरच स्पष्ट केल्याप्रमाणे मुख्यमंत्री सध्याच्या आघाडीतून बाहेर पडले आणि आमच्यासोबत युती केली तर त्याला पूर्ण पाठिंबा आहे.

अख्तरुल इमान नेमकं काय म्हणाले?

AIMIMचे बिहार प्रदेशाध्यक्ष अख्तरुल इमान यांनी यासगळ्या विषयावर काव्यात्मक पद्धतीने प्रतिक्रिया दिली. पक्ष सोडून गेलेल्यांची काय परिस्थिती झाली ही सर्वांनी पाहिली आहे. त्यांनी पुढे असाही दावा केला की पक्षाचे आमदार त्यांच्या भूमिकेवर पूर्णपणे ठाम आहेत आणि पक्षात कोणत्याही प्रकारे फूट पडण्याची काडीमात्र शक्यता नाही.
दरम्यान, राष्ट्रीय जनता दलाचे आमदार रणविजय साहू म्हणाले की, “खरंतर AIMIMची विचारसरणी मुख्यमंत्र्यांपेक्षा तेजस्वी यादव यांच्याशी अधिक मिळती जुळती आहे”. या चर्चांनंतर भारतीय जनता पक्षाचे मंत्री लखेंद्र पासवान यांनी मोठा दावा केलाय, की “बरेच विरोधी आमदार सरकारच्या कामाने प्रभावित झाले असून ते सतत संपर्कात आहेत”.

2022 मध्ये AIMIM पक्षासोबत झाला होता गेम

2022मध्ये असदुद्दीन ओवेसी यांच्या AIMIMसोबत मोठा राजकीय गेम झाला होता. 2022 मध्ये AIMIMचे पाचपैकी चार आमदार तेजस्वी यादव यांच्या पक्ष RJDमध्ये सामील झाले होते. केवळ अमूरचे आमदार आणि AIMIM बिहारचे अध्यक्ष अख्तरुल इमान ओवेसीसोबत राहिले. उर्वरित चार आमदार – सय्यद रुकनुद्दीन अहमद (बयासी), शाहनवाज आलम (जोकीहाट), मोहम्मद इझार असफी (कोचाधामन) आणि मोहम्मद अंजार नईमी (बहादूरगंज) यांनी पक्षाला नारळ दिला होता.

बिहारमध्ये राजकीय पेच वाढला!

एकूणच राजकीय प्रतिक्रियांमध्ये बिहारच्या राजकारणाला वेगळं वळण पात्र झालं आहे. संभाव्य फेरफार आणि युतीच्या चर्चांच्या उसळीमुळे संपूर्ण राजकीय वातावरणात घमासान पाहायला मिळत आहे. अद्याप कोणतीही फुट किंवा पक्षांतर झाल्याचे अधिकृत माहिती समोर आली नसून नेत्यांच्या वक्त्याव्यामुळे मात्र चर्चांना दुजोरा मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात परिस्थिती कोणत्या दिशेने जाणार आणि कोणतं वळणं घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेलं आहे.

काँग्रेस-BJP ने मिळून ठरवला महापौर, महाराष्ट्रातील ‘या’ नगरपालिकेत मिळाला एकनाथ शिंदेना झटका!

Web Title: Patna asaduddin owaisi aimim bihar politics big speculation mla break

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 05:48 PM

Topics:  

  • AIMIM
  • Asaduddin Owaisi
  • Bihar Political Crisis
  • Bihar Politics

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.