Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FDA Raids in Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये FDA ची धडक कारवाई ! २५ लाखांचे तेल आणि तूप जप्त, परवाना निलंबित

FDA Raids in Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्न व औषध प्रशासनाने भेसळीच्या संशयावरून दोन ठिकाणी छापे टाकत तब्बल २५ लाख ७ हजार १९० रुपये किमतीचा अन्नपदार्थांचा साठा जप्त केला. लासूर स्टेशन येथील रवी ऑइल इंडस्ट्रीजमधून ४ लाख ८७ हजार रुपये किमतीचे २,७१० किलो रिफाइंड सोयाबीन तेल जप्त करण्यात आले.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 03, 2026 | 02:19 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • रवी ऑइल इंडस्ट्रीजवर कारवाई   
  • मेसर्स दिव्य महावितरकवर कारवाई  
  • अहवाल आल्यानंतर कायदेशीर कारवाई 
FDA Raids in Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर मध्ये अन्नपदार्थांच्या गुणवत्तेतील त्रुटी आणि भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दोन ठिकाणी शनिवारी धडक कारवाई केली. गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील रवि ऑईल इंडस्ट्रीजवर छापा मारून २, ७१० किलो रिफाइंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त करण्यात आला. या तेलाची किमत चार लाख ८७ हजार रुपये असून या उद्योगाचा अन्न व्यवसाय परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला. याशिवाय शहरातील सुंदरवाडी येथील पतंजली आयुर्वेदच्या सुपर डिस्ट्रीब्युटरच्या गोदामात छापा मारून पथकाने २० लाख २० हजार १९० रुपये किमतीचे २,२८० लिटर गायीचे तूप जप्त करण्यात आले. दोन्ही कारवायांत एकूण २५ लाख सात हजार १९० रुपयांचा साठा प्रशासनाने ताब्यात घेतला आहे.

रवी ऑइल इंडस्ट्रीजवर कारवाई

गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील रवी ऑइल इंडस्ट्रीज या आस्थापनेची अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांनी आकस्मिक तपासणी केली. या तपासणीत आस्थापनेला अन्नसुरक्षेच्या निकषांवर एकूण ८६ पैकी केवळ ३० गुण म्हणजेच ३५ टक्के गुण मिळाले. तपासणीदरम्यान परवान्यात व्यवसायाची नोंद ‘जनरल मॅन्युफॅक्चरिंग’ अशी असताना प्रत्यक्षात केवळ ‘रिपॅकर’ म्हणून काम सुरू असल्याचे आढळले. व्यवसायाच्या स्वरूपातच तफावत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.

Amravati News: फ्लाईंग अकॅडमीला मान्यता!देशातील सर्वात मोठ्या प्रशिक्षणासाठी ३४ विमाने सज्ज; पहिल्या तुकडीत १८० प्रशिक्षणार्थी 

मेसर्स दिव्य महावितरकवर कारवाई

दुसरी कारवाई सुंदरवाडी येथील केंब्रिज स्कूलजवळ असलेल्या मेसर्स दिव्य महावितरक या पतंजली आयुर्वेदच्या सुपर डिस्ट्रीब्युटरच्या गोदामात करण्यात आली. संबंधित आस्थापना विजय कडुबा जाधव यांच्या मालकीची असल्याची माहिती प्रशासनाने दिली. येथे विक्रीसाठी ठेवलेल्या पतंजली गायीच्या तुपाच्या दोन बॅचमधील साठ्यावर भेसळयुक्त असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत ‘काऊ घी ०१’ या उत्पादनाच्या एनसीडीएफ २६०१७० बॅचमधील २,९९८ युनिट्स म्हणजेच १,३४९.१ लिटर तूप आढळले. त्याची किंमत १२ लाख २९ हजार १८० रुपये आहे. तर ‘काऊ घी ०२’ या एनसीडीजी २६०११५ बॅचमधील १,०३४ युनिट्स म्हणजेच ९३०.६ लिटर तूप आढळले.

अहवाल आल्यानंतर कायदेशीर कारवाई

अन्नसुरक्षा आणि मानके कायदा, २००६ मधील तरतुदीनुसार हा साठा जप्त करून सुरक्षित ताब्यात ठेवण्यात आला आहे. संबंधित तुपाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर उत्पादनाव्या गुणवत्तेबाबत स्पष्टता येईल आणि त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Amravati News: एसएनए स्पर्श प्रणालीने मुख्याध्यापक त्रस्त! अनुदान खर्चाची प्रक्रिया सुलभ करण्याची शिक्षक समितीची मागणी

 

Web Title: Chhatrapati sambhajinagar fda raid patanjali ghee soybean oil seized sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • FDA
  • sambhaji nagar news

संबंधित बातम्या

तुकाराम मुंढेंना धक्का ! थेट मंत्रिमहोदयांनीच बदलला ‘तो’ निर्णय; कारवाईलाच स्थगिती
1

तुकाराम मुंढेंना धक्का ! थेट मंत्रिमहोदयांनीच बदलला ‘तो’ निर्णय; कारवाईलाच स्थगिती

Sambhajinagar News : जिल्ह्यातील ४ हजार ३३ शाळांचे मूल्यांकन; ८ शाळांना राज्यस्तरीय स्पर्धेची संधी
2

Sambhajinagar News : जिल्ह्यातील ४ हजार ३३ शाळांचे मूल्यांकन; ८ शाळांना राज्यस्तरीय स्पर्धेची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.